कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 07:08 PM2022-10-29T19:08:50+5:302022-10-29T19:09:16+5:30

तीन दरवाजा परिसरात बुरुजावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरुणींची मोठी गर्दी; पण बुरुज धोकादायक असल्याने दुर्घटना होण्याचा धोका

Tourists rush to Panhalgad due to Diwali holiday | कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर

कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर

Next

पन्हाळा: दिवाळी सुट्टीत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दिवाळीतील विकएंड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळा पर्यटकांच्या गर्दीने भरून गेला आहे. पर्यटकांच्या शिस्तीसाठी पोलिसांचे सहकार्य नगरपरिषदेस होत आहे.

तीन दरवाजा, सज्जा कोटी, लता मंगेशकर बंगला परिसरात पर्यटकांची रेलचेल आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे गडावरील हॉटेल हाऊसफुल्ल आहेत, तर लहान मोठ्या हॉटेलनाही सुगीचे दिवस आले आहेत. तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना चांगले दिवस आहेत. पर्यटकांना गाडी पार्किंगची व्यवस्था नसल्याने मात्र पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

पर्यटक लहान मुलांसह रेल्वे, मोटारसायकल, रिक्षा चारचाकी, लंडन बस, सायकलचा आनंद लुटत आहेत. तबक उद्यान- तीन दरवाजा असा हा मार्ग असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी आहे. नगरपालिका प्रवासी कराच्या माध्यमातून लाखोंचा कर गोळा करत आहे. शुक्रवार, शनिवार व रविवार रोज एक लाख प्रवासीकर मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

तीन दरवाजा परिसरात बुरुजावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरुणींची मोठी गर्दी आहे; पण बुरुज धोकादायक असल्याने दुर्घटना होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे. लहान मोठे व्यावसायिक पर्यटकांच्या गर्दीमुळे खुश आहेत.

Web Title: Tourists rush to Panhalgad due to Diwali holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.