Kolhapur: पावसामुळे रांगणा किल्ल्यावर गेलेले पर्यटक अडकले, पहाटे सुरक्षित स्थळी आणण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:04 PM2023-07-19T12:04:39+5:302023-07-19T12:05:58+5:30

शिवाजी सावंत गारगोटी : रांगणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले सतरा पर्यटक पावसामुळे किल्ल्याच्या परिसरात अडकून पडले. त्यांना अंतुर्ली (ता.भुदर गड ...

Tourists who went to Rangana Fort got stuck due to rain, managed to bring them to a safe place in the morning | Kolhapur: पावसामुळे रांगणा किल्ल्यावर गेलेले पर्यटक अडकले, पहाटे सुरक्षित स्थळी आणण्यात यश 

Kolhapur: पावसामुळे रांगणा किल्ल्यावर गेलेले पर्यटक अडकले, पहाटे सुरक्षित स्थळी आणण्यात यश 

googlenewsNext

शिवाजी सावंत

गारगोटी : रांगणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले सतरा पर्यटक पावसामुळे किल्ल्याच्या परिसरात अडकून पडले. त्यांना अंतुर्ली (ता.भुदरगड)चे सरपंच रामदास देसाई आणि शिवाज्ञा गडकोट समितीच्या सदस्यांना पहाटे सुरक्षित स्थळी आणण्यात यश आले.

काल, मंगळवारी (दि.१८) रांगणा किल्ला पाहण्यासाठी कागल आणि इचलकरंजी येथील काही हौशी पर्यटक गेले होते. किल्ला पाहून रात्री परतत होते. पण दिवसभर जोरदार पाऊस सुरू असल्याने ओढ्याना पाणी आले होते. ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ते पलीकडे येऊ शकत नव्हते. त्यांच्यातील एक सदस्य लवकर आल्याने तो अलीकडे आला होता. रात्री अंधार पडला तरी ते आले नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली. त्यांनी याची खबर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना दिली. पोलिसांनी तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी रेस्क्यु टीमला पाचारण केले.

तत्पूर्वी तहसीलदार अडसूळ यांनी अंतुर्लीचे सरपंच रामदास देसाई यांना त्या ओढ्याजवळ जाऊन रेसक्यू टीम येईपर्यंत कोणालाही अलीकडे येऊ देऊ नका असे सांगितले. एव्हाना रात्रीचे दीड वाजले होते. सरपंच देसाई यांनी पोलिस पाटील बाबाजी देसाई, शिवाज्ञा गडकोट समितीचे सदस्य सचीन देसाई (सर्वजण अंतुर्ली) गुरुनाथ वास्कर (शिवडाव), प्रकाश परब (तांब्याचीवाडी) यांना सोबत घेऊन मार्गक्रमण सुरू केले. त्यांना थोडे अंतर गेल्यावर ओढ्याच्या पलीकडे पर्यटक दिसले. पावसाचा जोर ओसरल्याने ओढ्याचे पाणी कमी झाले होते. पहाटे पाचच्या सुमारास सर्व सतरा पर्यटकांना सुखरूप सुरक्षित स्थळी आणले. यामध्ये एका महिलेचा समावेश होता.

एव्हाना रिस्क्यु टीम, पोलिस कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य ही सर्व मंडळी पोहचली होती. यावेळी कागलचे नगरसेवक कुमार पिस्ते हे कागलमधील नागरिकांना घेण्यासाठी त्यांच्या सहक-यांसह तेथे आले होते. सोशल मीडियावर रेस्क्यु टीमचे व शिवाज्ञा गडकोट समितीच्या सदस्याचे कौतुक होत आहे. भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी अडसूळ यांनी पर्यटकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये असे आवाहन केले.
 

Web Title: Tourists who went to Rangana Fort got stuck due to rain, managed to bring them to a safe place in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.