सानेगुरुजी वसाहतीमध्ये भाजीमंडई पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:28+5:302020-12-13T04:37:28+5:30

उपनगरातील वाहतूक कोंडी दूर : पदपथही घेणार मोकळा श्वास अमर पाटील : कळंबा : सानेगुरुजी वसाहतीमध्ये उभारण्यात ...

Towards completion of vegetable market in Saneguruji colony | सानेगुरुजी वसाहतीमध्ये भाजीमंडई पूर्णत्वाकडे

सानेगुरुजी वसाहतीमध्ये भाजीमंडई पूर्णत्वाकडे

Next

उपनगरातील वाहतूक कोंडी दूर : पदपथही घेणार मोकळा श्वास

अमर पाटील :

कळंबा : सानेगुरुजी वसाहतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या भाजीमंडईचे काम पूर्णत्वाकडे आल्याने आपटेनगर, जीवबानाना पार्क, कणेरकर नगर, रंकाळा तलाव, सुर्वेनगर, राजलक्ष्मीनगर, रिंगरोड या प्रभागातील नागरिकांना लवकरच एकाच छताखाली भाजीपाला खरेदी करता येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधाच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत मिळालेल्या साठ लाखांच्या विकासनिधीतून प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत येथील सूर्यवंशी कॉलनीमधील पालिकेच्या खुल्या आरक्षित जागेवर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त भाजीमंडईचे काम पूर्णत्वास येत असून, लवकरच लोकार्पण सोहळ्यानंतर प्रारंभ करण्यात येणार आहे.

दक्षिणेच्या उपनगरात आपटेनगर जीवबानाना पार्क कणेरकर नगर, रंकाळा तलाव, सुर्वेनगर, राजलक्ष्मीनगर, रिंगरोड या प्रभागातील नागरिकांसाठी स्वतंत्र भाजीमंडई विकसित झालीच नसल्याने पदपथावर ठाण मांडून बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांकडून नागरिकांना भाजीपाला फळे खरेदी करावी लागत होती. ग्राहकांनी रस्त्याकडेस लावलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी, किरकोळ अपघात, वादावादी नित्याची बनली होती.

काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आरक्षित जागेवर पालिकेमार्फत दर्जेदार भाजीमंडई उभारण्यासाठी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी प्रयत्न केला होता. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे काम रखडले, नंतर रस्त्यावरच्या भाजीमंडईस आळा बसावा यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा पर्याय त्यांनी प्रशासनापुढे ठेवला ज्यास निविदा प्रक्रिया राबवूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. २०१३ साली पाच लाखांचा विकासनिधी खर्चून मंडई विकसित करण्यात आली; पण निवाऱ्यासह अन्य मूलभूत सुविधांची वानवा असल्याने मंडई विकसित झालीच नाही.

आता मात्र सानेगुरुजी वसाहत प्रभागात उभारण्यात आलेल्या ६० लाखांच्या भव्य भाजीमंडईमुळे विक्रेत्यांची एकाच छताखाली सोय होणार असल्याने नागरिकाची गैरसोय होणार नाही, शिवाय उपनगरात पदपथ मोकळा श्वास घेतील या मंडईत सुमारे ७२ भाजीपाला फळे विक्रेत्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून, पार्किंग स्वच्छतागृहे हायमास्ट पथदिवे पिण्याच्या पाण्याची व कचरा व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे आता एकाच छताखाली भाजीपाला फळे उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांची चांगली सोय होणार आहे

प्रतिक्रिया नगरसेविका मनीषा कुंभार

उपनगरात दर्जेदार भाजीमंडई विकसित व्हावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून, पदपथावरील अतिक्रमणे दूर होऊन रस्ते मोकळा श्वास घेतील याचे योग्य व्यवस्थापन प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

फोटो मेल केला आहे

फोटो ओळ

प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत येथील सूर्यवंशी कॉलनीतील पालिका आरक्षित जागेवर उभारण्यात येणाऱ्या साठ लाखांच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त भाजीमंडईचे काम पूर्णत्वास गेले आहे.

Web Title: Towards completion of vegetable market in Saneguruji colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.