शाहूवाडी तालुका कोरोनामुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:31 AM2021-08-17T04:31:11+5:302021-08-17T04:31:11+5:30

शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. ३ हजार ६३६ कोरोना ...

Towards coronation of Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुका कोरोनामुक्तीकडे

शाहूवाडी तालुका कोरोनामुक्तीकडे

Next

शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. ३ हजार ६३६ कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी सोडले आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

गेल्या चार महिन्यांत शाहूवाडी तालुक्यात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला होता. त्यामुळे तालुका प्रशासनाने संपूर्ण तालुका लॉकडाऊन केला होता. मार्च महिन्यापासून ३ हजार ८७४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. ३ हजार ६३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १०१ कोरोना रुग्णांचा मुत्यू झाला आहे. अल्फोन्सा करंजोशी व प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय पेरीड येथे कोरोना सेंटर सुरू आहे. सध्या १३८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आठ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. पॉझिटिव्ह व मुत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. ६० हजार २०४ नागरिकांना पहिला डोस आरोग्य विभागाने दिला आहे. ३५ हजार २११ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ हजार ४४७ नागरिकांची स्वॅब तपासणी केली आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावात आरोग्य विभागाने पाच ते सहा पथके तयार करून तपासणी सुरू केली आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य सहायक, सेविका, वैद्यकीय कर्मचारी पथकात सामील आहेत.

Web Title: Towards coronation of Shahuwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.