इचलकरंजी नगरपालिकेत नगररचनाकारची नेमणूक करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:44+5:302021-06-23T04:17:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिका राज्यातील अ वर्ग दर्जाची नगरपालिका आहे. या ठिकाणी नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिका राज्यातील अ वर्ग दर्जाची नगरपालिका आहे. या ठिकाणी नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात कामकाज सुरू असते. मात्र, पालिकेत कायमस्वरूपी नगररचनाकार नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिकेत नगररचनाकारची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेवक मदन कारंडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागात सध्या नगररचनाकार या पदासाठी तात्पुरती स्वरूपात नेमणूक केली आहे. कायमस्वरूपी नगररचनाकार नसल्याने नगररचना विभागात भू-संपादन, बांधकाम परवाना, रस्ते विकास, रस्ते रचना, नगररचना योजना यासह अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे नगररचनाकाराची नेमणूक करावी, अशी मागणी केली. त्यावर मंत्री शिंदे यांनी या पदासाठी नेमणूक करण्यासाठी संबंधितांना आदेश दिले असल्याचे सांगितले. यावेळी अमित गाताडे उपस्थित होते.