गवताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस आग, प्रसंगावधानाने जीवित हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 03:11 PM2020-12-25T15:11:48+5:302020-12-25T15:12:49+5:30
Tractor Fire Kolhapur- विद्युत मंडळाच्या विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट झाल्याने कोते-खामकरवाडी रोडवर गवताने भरलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीस भीषण आग लागून ट्रॅक्टरमधील दोन हजार गवताच्या पेंड्या जळून गेल्या. ट्रॅक्टर चालकाच्या प्रसंगावधानाने मात्र जीवितहानी टळली. यात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
धामोड ; विद्युत मंडळाच्या विद्युत वाहिनीला शॉर्टसर्किट झाल्याने कोते-खामकरवाडी रोडवर गवताने भरलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीस भीषण आग लागून ट्रॅक्टरमधील दोन हजार गवताच्या पेंड्या जळून गेल्या. ट्रॅक्टर चालकाच्या प्रसंगावधानाने मात्र जीवितहानी टळली. यात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
खामकरवाडी (ता .राधानगरी) येथील विलास लहु हळदे यांचा ट्रॅक्टर येथील बळवंत विठ्ठल भिऊंगडे यांचे गवत घेऊन कोते मार्गे खामकरवाडीकडे येत होता . कोते येथील गोठनाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरलेल्या गवताचा स्पर्श विद्युत वाहिनीला झाल्याने शॉर्टसर्किट झाले. ट्रॉलीतील गवताने अचानक पेट घेतला . ट्रॅक्टर चालक विक्रम हळदे याच्या लक्षात ही बाब येताच त्यांने तात्काळ प्रसंगावधान राखून ट्रॉलीपासून ट्रॅक्टर वेगळा केला,त्यामुळे जीवितहानी टळली .
ट्रॉलीत भरलेल्या दोन हजार गवत पेंडया आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे . पेट्रोलमुळे टायरही खाक झाल्या आहेत. गावातील काही तरुणांनी शेजारी असलेली विद्युत मोटार सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण ट्रॉलीत भरलेले गवत हे वाळलेले असल्याने आग विझवणे शक्य झाले नाही .