प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल व्यापाऱ्यास १0 हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 05:06 PM2020-02-07T17:06:34+5:302020-02-07T17:07:26+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून १0 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरिकांना ११५० रुपये दंड करण्यात आला.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून १0 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरिकांना ११५० रुपये दंड करण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणाऱ्या नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
बुधवारी लक्ष्मीपुरी परिसर येथील मनीष ट्रेडर्स यांच्यावर प्लास्टिकविरोधी पथकाने दुसऱ्यांदा कारवाई करून एकूण १0 हजार रुपये दंड वसूल केला.
सदरची कारवाई आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील, शिवाजी शिंदे, सौरभ घावरी, गीता लखन यांनी केली.