डीवायपी पॉलिटेक्निकची उज्वल निकालाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:26 AM2021-09-03T04:26:11+5:302021-09-03T04:26:11+5:30

नवे पारगाव : तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य तंत्रनिकेतन शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या डिप्लोमा ...

Tradition of bright results of DYP Polytechnic | डीवायपी पॉलिटेक्निकची उज्वल निकालाची परंपरा

डीवायपी पॉलिटेक्निकची उज्वल निकालाची परंपरा

Next

नवे पारगाव : तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य तंत्रनिकेतन शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंग परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. संगणक विभागाच्या क्रांती गिरीगोसावी हिने महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला.

विभागनिहाय निकाल असा : विद्युत अभियांत्रिकी तृतीय वर्ष - रोहन चव्हाण (87.67), पल्लवी शिंदे (86.72), विद्युत अभियांत्रिकी द्वितीय वर्ष-शाहिस्ता मुलाणी, तेजस हुजरे आणि विभावरी जाधव यांनी 75 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. खुशबू मुल्ला (74.13), कॉम्प्युटर विभाग तृतीय वर्ष- क्रांती गिरीगोसावी ( 90.57), सायली मोहिते (87.77). संगणक विभाग द्वितीय वर्ष - सायली पाटील ( 86), चैतन्य सकटे ( 82.90) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग तृतीय वर्ष- राहुल चौगुले (84.40), साक्षी पाटील - (77.20), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग-द्वितीय वर्ष- प्रणव पाटील (71.56), हुजेफा मुजावर (66.44), स्थापत्य विभाग तृतीय वर्ष

आशिष जाधव (84), सम्राट पाटील (81.84), स्थापत्य विभाग द्वितीय वर्ष- प्रज्वल माने (82.13), सानिका मोहिते (80.75), यांत्रिकी विभाग तृतीय वर्ष

श्रेयश कोळी (85.49), विराज पाटील (85.13), यांत्रिकी विभाग द्वितीय वर्ष

महेश चव्हाण (86.25), राहुल करपे ( 82.10), प्रथम वर्ष विभाग- विभावरी सुतार (87.63), विनिता पाटील (84).

संगणक विभागाच्या क्रांती गिरीगोसावी हिने महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, रजिस्ट्रार प्रकाश भागाजे यांनी अभिनंदन केले.

फोटो: 1.क्रांती गिरीगोसावी 2.पल्लवी शिंदे 3.रोहन चव्हाण

Web Title: Tradition of bright results of DYP Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.