करूळ घाटमार्गे वाहतूक होतेय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:31+5:302021-07-28T04:24:31+5:30
अतिवृष्टीत करूळ घाटाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. १२ जुलै रोजी घाटातील मोरीनजीकचा अर्धा भाग खचल्याने हा घाट राष्ट्रीय ...
अतिवृष्टीत करूळ घाटाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. १२ जुलै रोजी घाटातील मोरीनजीकचा अर्धा भाग खचल्याने हा घाट राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतुकीस बंद होता. जवळपास १३ ते १४ दिवस याठिकाणी खचलेल्या भागाच्या बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. गेले १४ दिवस करूळ घाट बंद होता, तसेच भुईबावडा घाटाला मोठ्या भेगा गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा घाट अनिश्चित काळासाठी बंद ठेवला आहे. तालुक्यातून जाणारे हे प्रमुख घाट मार्ग बंद असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहनचालकांना फोंडाघाटमार्गे प्रवास करावा लागत होता. आजपासून करूळ घाट मार्ग वाहतुकीस पूर्ववत होत असल्याने वाहन चालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.