कोल्हापूर- गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरु, केवळ सुरक्षेसाठी बॅरिकेड्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:19 PM2023-07-24T14:19:09+5:302023-07-24T14:34:17+5:30
बालिंगा पुलावरुन होणारी वाहतूक बंद करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून असंतोष
प्रकाश पाटील
कोपार्डे : आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बालिंगा पुलाच्या पूर्वेला व पश्चिमेला सुरक्षेच्या कारणावरून बॅरेकेट्स उभा केली आली होती. पण रस्ता बंद करण्यात आला नव्हता. बॅरेकेट्स उभी केल्याने बालिंगा पुलावरुन होणारी वाहतूक बंद करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमधून असंतोष व्यक्त करण्यात येत होता.
मुसळधार पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बालिंगा फुलाची मच्छिंद्र होणार असल्याने वरिष्ठ पातळीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हा रस्ता बंद करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची पूर्वतयारी म्हणून या विभागाची अधिकारी कर्मचारी व ठेकेदाराचे कामगार यांनी परिस्थितीचा आढावा न घेताच मुख्य रस्त्यावर साबळेवाडी फाटा आणि महादेव मंदिर बालिंगा येथे थेट बॅरेकेट्स लावून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या वाद सुरू झाला. काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर बॅरॅकेटच्या बाजूने वाहन चालक वाहनांची येजा करू लागले. अर्ध्या तासानंतर रस्त्यावरील बॅरेकेट्स बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे कोल्हापूर गगनबावडा रस्ता बंद करण्यात आल्याची अफवाच ठरली आहे. सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू आहे.