पिरळ पूल पाण्याखाली गेल्याने राधानगरी तालुक्यातील वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:18+5:302021-07-23T04:15:18+5:30
दरम्यान, भोगावती नदीवर असणाऱ्या शिरगाव, कसबा तारळे, पडळी बंधाऱ्या पाठोपाठ राधानगरी-पिरळ दरम्यानचा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा पूलही गुरुवारी दुपारी पाण्याखाली ...
दरम्यान, भोगावती नदीवर असणाऱ्या शिरगाव, कसबा तारळे, पडळी बंधाऱ्या पाठोपाठ राधानगरी-पिरळ दरम्यानचा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा पूलही गुरुवारी दुपारी पाण्याखाली गेला. परिणामी येथून राधानगरी, फोंडा, मुदाळतिट्टा, भोगावती, कोल्हापूरकडे होणारी वाहतूक कसबा तारळे, खिंडीव्हरवडे मार्गे वळवण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गावरदेखील अनेक ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ सुरू असून यावर्षी दुसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पात्राबाहेर पडलेले पाणी नदीकाठावरील भात तसेच ऊस पिकांत शिरल्याने दोन्ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.
फोटो : २२ पिरळ पूल
राधानगरी-पिरळदरम्यान असणारा पूल गुरुवारी पाण्याखाली गेला.
छाया- रमेश साबळे