वाहतूकदारांनी महामार्ग रोखला : पाचशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:07 AM2018-07-23T00:07:23+5:302018-07-23T00:07:31+5:30

Traffic shutters blocked: 500 crores turnover jam | वाहतूकदारांनी महामार्ग रोखला : पाचशे कोटींची उलाढाल ठप्प

वाहतूकदारांनी महामार्ग रोखला : पाचशे कोटींची उलाढाल ठप्प

Next

कोल्हापूर :डिझेल दरवाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या बंदमुळे जनजीवनावर अद्यापही थेट परिणाम झाला नसला तरी तरीही पाचशे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. आज, सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला असून यामुळे याची झळ सर्वसामान्यांना बसू शकते.
आॅल इंडिया मोटर्स ट्रॉन्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने वारंवार होणारी इंधन दरवाढ रद्द करावी, टोल प्रक्रिया पारदर्शी करावी, ‘थर्ड पार्टी’ विमा हप्त्यामधील वार्षिक दरवाढ रद्द करावी, जीएसटी व ई-वे बिलातील अडचणी, भाडे देण्यासाठी होणाºया विलंबात सुधारणा करावी, पर्यटन वाहनासाठी दीर्घ मुदतीसाठी आॅल इंडिया परमिट मिळावे, आरटीओ व पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, आयकर कलम ४४ ए नुसार बेकायदेशीर आकारणी होणारा आयकर रद्द करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांकरिता हा चक्काजाम सुरू करण्यात आला आहे. यात देशभरातील मालवाहतूकदार सहभागी झाले आहेत.
रविवारी जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनतर्फे विविध गट तयार करून महामार्गावर वाहतूक रोखण्याचे काम सुरू होते. यात मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली, आदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील वाहतूक रोखली जात होती. यातील ट्रकचालकांना वाहने रस्त्याकडेला लावण्याची सक्ती केली जात होती.
इचलकरंजीतील २५० कोटींची उलाढाल ठप्प
वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाचा येथील वस्त्रोद्योगावर परिणाम दिसू लागला असून, दररोजची २५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत. कापड व्यापाºयांकडून यंत्रमाग कापडाचे सौदे रद्द करण्याची स्थिती निर्माण झाल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे.
शहरामधील यंत्रमागावर कापड विणण्यासाठी आवश्यक असलेल्या सुतापैकी सुमारे ८० टक्के सूत दक्षिणेतील तामिळनाडू व आंध्र राज्यातून येते. तसेच येथे उत्पादित झालेले कापड गुजरात, राजस्थान व दिल्ली येथील पेठांमध्ये विक्री केले जाते. २० जुलैपासून सुरू झालेल्या वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनामुळे सुताची आवक ठप्प झाली आहे. तसेच येथून जाणाºया कापडाची वाहतूकसुद्धा बंद पडली आहे. कापडाची जावक बंद झाल्याने कापड खरेदी करणाºया व्यापाºयांकडून यापूर्वी केलेले सौदे रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दररोज येणारे आणि जाणारे कापड यांची सुमारे २५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असते. संपामुळे सूत व कापड यांची वाहतूक ठप्प झाल्याने ही आर्थिक उलाढाल बंद पडण्याची शक्यता आहे.
आर्थिक कोंडी होण्याची भीती
वस्त्रोद्योगात मंदीच्या पार्श्वभूमीवर चक्काजाम आंदोलनाचा अवघ्या दोन दिवसांतच वस्त्रोद्योगावर परिणाम दिसत आहे. कापड व्यापाºयांकडून कापडाची डिलिव्हरी घेण्याचे बंद झाले असून कापडाचे चेकींगसुद्धा ठप्प झाले आहे.

Web Title: Traffic shutters blocked: 500 crores turnover jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.