कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये आगीचा तब्बल तीन तास थरार, रेल्वे डबा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 11:06 AM2021-12-06T11:06:32+5:302021-12-06T11:25:34+5:30

ही आग इतकी भीषण होती की आगीत रेल्वे डबा जळून खास झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

Train fire at Kolhapur railway station | कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये आगीचा तब्बल तीन तास थरार, रेल्वे डबा खाक

कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये आगीचा तब्बल तीन तास थरार, रेल्वे डबा खाक

Next

कोल्हापूर : रेल्वे स्टेशनमध्ये पार्किंग यार्डमधील एका रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वे डबा जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले. काल, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पार्किंग यार्डमधील एका रेल्वे डब्याला आग लागली. ह्या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला दिली. काही क्षणातच या आगीने मोठी पेट घेतल्याने आगीच्या ज्वाला भडकू लागल्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

मात्र, या आगीत रेल्वेचा पूर्ण डबा जळून खाक झाला. यात रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. रात्री बारानंतर रेल्वे स्टेशनवरुन कोणतीही वाहतूक होत नसल्याने मोठा अनर्थ टळला. पण आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे अधिकारी व पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Train fire at Kolhapur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.