नवे दानवाडमध्ये संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:29+5:302021-06-17T04:16:29+5:30
शिरोळ : नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि अॅक्शन अॅड यांच्या संयुक्त ...
शिरोळ : नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि अॅक्शन अॅड यांच्या संयुक्त विद्यमाने महापूर संकटावर मात करण्यासाठी ग्रामस्थांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
गतवर्षी आपत्ती व्यवस्थापनाचे १९ प्रकारचे साहित्य नवे दानवाड ग्रामपंचायतीला दिले होते. यावर्षी गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली तर ग्रामस्थांवर येणाऱ्या आपत्कालीन संकटापासून कशाप्रकारे संरक्षण करावे यासाठी व गतवर्षी झालेल्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा पाठपुरावा घेण्यासाठी डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि अॅक्शन अॅड यांनी नवे दानवाड याठिकाणी एकदिवसीय प्रशिक्षण घेतले. यावेळी प्रशिक्षक वजीर रेस्क्यू फोर्सचे महेश भोई, प्रथमेश परिट व प्रथमेश पोतदार यांनी ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.
यामध्ये लाईफ बॉय रिंगचा वापर कसा करावा, गाठीचे अनेक प्रकार, लाईफ जॅकेट कसे वापरावे, प्रथमोपचारांचा कसा व कधी वापर करावा तसेच आपत्ती म्हणजे काय तसेच अनेक साहित्यांचेही प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच वंदना कांबळे, कमल कांबळे, शहानूर गवंडी, राहुलराज कांबळे, अमोल कदम, नीता आवळे उपस्थित होते.
फोटो - १६०६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - नवे दानवाड (ता. शिरोळ) येथे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले.