कोल्हापूर मनपाच्या सर्वच शाळांत ई-लर्निंग शिक्षकांना प्रशिक्षण : आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:55 PM2017-12-27T23:55:12+5:302017-12-27T23:56:43+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांतील ‘स्तर’ उंचावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांतील ‘स्तर’ उंचावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी कोल्हापूर महापालिकेच्या किमान एका शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकन मिळत असल्याने या शाळांची गुणवत्ता सिद्ध झाली आहे. सध्याच्या स्थितीत १७ शाळांत ई-लर्निंग सुविधा दिली असली तरी येत्या शैक्षणिक सत्रात सर्व ५९ प्राथमिक शाळांत ही सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
खासगी प्राथमिक शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळानेही विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. कृती कार्यक्रम राबवून त्या शाळेतील पटसंख्या वाढीबरोबर शिक्षणाचा दर्जाही वाढविण्यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे राज्य शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा असो अगर कोणतीही खासगी परीक्षा; या शााळांतील विद्यार्थी यशाच्या शिखरावर चमकत आहेत; गेल्या पाच वर्षांत विद्यार्थी पटसंख्येसह गुणवत्तावाढीलाही चालना मिळत आहे.
अनेक विद्यार्थी अन् शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू लागल्याने पालकांचीही मानसिकता आता बदलण्यास वेळ लागणार नाही. खासगी शाळांमध्ये दिल्या जाणाºया सर्व सुविधा किंबहुना त्यापेक्षा जादा सेवा-सुविधा देता याव्यात यासाठी प्राथमिक शिक्षण समितीने हालचाली सुरू केल्या आहेत.
शाळा, विद्यार्थी यशोशिखरावर शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत ४७ विद्यार्थी चमकले असून पुढील शैैक्षणिक वर्षात ते १०० वर नेण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षात टेंबलाईवाडी विद्यालयातील विद्यार्थी वर्धन माळी याने शिष्यवृती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान मिळविला. जरगनगरातील ल. रा. जरग विद्यालय या शाळेत १४६८ विद्यार्थी पटसंख्या असून, या शाळेचे नाव आंतरराष्टÑीय नामांकनासाठी निश्चित केले आहे.
पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न
सध्या महापालिकेच्या शाळांत ९७१८ विद्यार्थी असून, एकूण असणाºया ५९ शाळांपैकी किमान १५ शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ही २०० हून अधिक आहे; तर बाबा जरगनगरातील ल. रा. जरग विद्यालयात सुमारे १४६८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच या शाळेबाहेर ‘हाऊसफुल्ल’ असा फलक लावून प्रवेश प्रक्रिया बंद करावी लागत असल्याचे दरवर्षी उदाहरण आहे. याशिवाय तळातील ५० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाºया सुमारे १४ शाळा असून, त्या सर्व शाळांत कृती कार्यक्रम राबवून २०२० पर्यंत २०० हून अधिक पटसंख्येचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
सर्वच शाळांत ई-लर्निंग
चालू शैक्षणिक वर्षात ई-लर्निंग सुविधा सर्व ५९ शाळांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे. त्याकरिता शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या शिक्षकांमार्फत शैक्षणिक अॅप्स, व्हिडिओ यांसारखे शैक्षणिक साहित्य तयार केले असून, या अॅप्सच्या माध्यमातून अॅँड्रॉईड टीव्ही, प्रोजेक्टरचा वापर करून शाळेतील सर्वच शाळांत ई-लर्निंग चालू शैक्षणिक वर्षात ई-लर्निंग सुविधा सर्व ५९ शाळांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहे. त्याकरिता शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या शिक्षकांमार्फत शैक्षणिक अॅप्स, व्हिडिओ यांसारखे शैक्षणिक साहित्य तयार केले असून, या अॅप्सच्या माध्यमातून अॅँड्रॉईड टीव्ही, प्रोजेक्टरचा वापर करून शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना पाठ देण्यात येणार आहेत.
मोबाईल टीचर
महापालिकेच्या शाळांत सुमारे सव्वादोनशेहून अधिक दिव्यांग विद्यार्थी असून त्यांना मोफत उपकरणे दिली आहेत. त्यांच्यावर आठवड्यातून दोन वेळा फिजिओथेरपीचे उपचार केले जातात. अतिदिव्यांग ७० विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न असून, प्रसंगी त्यांना घरी जाऊन शिक्षण दिले जाते. त्यासाठीही मोेबाईल टीचरच्या नियुक्त्या केल्या आहेत.
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या आणि दर्जावाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महापालिकेच्या शाळांत बालवाड्या सुरू करण्यासाठीच्या मंजुरीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.
- वनिता देठे, सभापती, प्राथमिक शिक्षण समिती, कोमनपा
महापालिकेच्या प्रत्येक शाळेत केटीएस सराव परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक आनंदी तर विद्यार्थी आनंदी हेच ध्येय ठेवले आहे. त्यासाठी शिक्षकांना ऊर्जा शिबिरातून सकारात्मक भावना निर्माण करण्याचा नवा प्रयत्न आहे.
- विश्वास सुतार, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ, कोमनपा