पदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:22 IST2020-11-10T12:18:46+5:302020-11-10T12:22:39+5:30
police, transcfer, kolhapurnews खात्यांतर्गत परीक्षा देऊन पदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली इतर परिक्षेत्रांत करण्यात आली होती, पण त्यांच्या वयोमानानुसार सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच करण्याचा महत्त्वपूर्व निर्णय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घेतला आहे.

पदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच!
कोल्हापूर : खात्यांतर्गत परीक्षा देऊन पदोन्नती मिळालेल्या ३९ पोलीस निरीक्षकांची बदली इतर परिक्षेत्रांत करण्यात आली होती, पण त्यांच्या वयोमानानुसार सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची बदलीकोल्हापूर परिक्षेत्रातच करण्याचा महत्त्वपूर्व निर्णय कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घेतला आहे.
राज्यातील पोलीस खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील ३९ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली होती. या पदोन्नतीबरोबरच त्यांच्या कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी बदल्या करण्यात आल्या होत्या.
पदोन्नती मिळालेल्यांपैकी बहुतेकजण सेवानिवृत्तीच्या जवळपास पोहोचले आहेत. त्यामुळे पदोन्नती मिळूनही बदलीमुळे कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर जावे लागणार असल्याने ते पोलीस अधिकारी आनंदाऐवजी नाराज झाले होते. त्यापैकी काहींनी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बदली कोल्हापूर परिक्षेत्रातच करण्याची विनंती केली होती, त्यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस निरीक्षकांची बदली कोल्हापूर परीक्षेत्रातच करण्याचा निर्णय लोहिया यांनी घेतला. या निर्णयामुळे सेवानिवृत्तीकडे झुकलेल्या नूतन पोलीस निरीक्षकांना आपल्या परिक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.