भुदरगड प्रांताधिकाºयांची बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:46 AM2021-02-06T04:46:18+5:302021-02-06T04:46:18+5:30

* मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी असलेले भुदरगडचे प्रांताधिकारी ...

Transfer Bhudargad prefect | भुदरगड प्रांताधिकाºयांची बदली करा

भुदरगड प्रांताधिकाºयांची बदली करा

Next

* मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा

आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी असलेले भुदरगडचे प्रांताधिकारी असंवेदनशील व बेजबाबदारपणे भूमिका घेत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न रेंगाळले आहेत. अशा प्रांताधिकाऱ्यांची तातडीने बदली करा किंवा पुनर्वसनाची जबाबदारी काढून घ्या, अशी मागणी करीत धरणग्रस्तांनी आज धरणाचे काम बंद पाडले, तर याच मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) आजरा तहसील कार्यालयावर धरणग्रस्तांचा मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे उचंगी व सर्फनाला हे प्रकल्प गेली अनेक वर्षांपासून रेंगाळले आहेत. धरणग्रस्तांकडून पुनर्वसनाचे प्रश्न वारंवार सांगूनही सुटलेले नाहीत. पुनर्वसनाची जबाबदारी असणारे भुदरगडचे प्रांताधिकारी धरणग्रस्तांच्या विरोधी भूमिका घेऊन काम करीत आहेत.

पुनर्वसन कायदा धाब्यावर बसवून, कायद्यातील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावून धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा हक्क नाकारला जात आहे. धरणग्रस्तांना लेखी नोटिसा काढून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा उद्योग प्रांताधिकारी यांनी राजरोसपणे सुरू ठेवला आहे. त्यामुळे धरणग्रस्तांचा अशा अधिकाऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांची बदली करा किंवा पुनर्वसनाचे अधिकार काढून घ्या, अशी मागणीही निवेदनातून केली आहे.

धरणग्रस्तांच्या सहकार्यामुळे धरणाचे काम सुरू आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसनापूर्वीच धरणाची घळभरणी करून पाणी अडविण्याचे नियोजन सुरू आहे. याला धरणग्रस्तांचा विरोध आहे.

निवेदनावर, संजय तर्डेकर, संजय भडांगे, प्रकाश मणकेकर, सुरेश पाटील, दत्तात्रय बापट यासह धरणग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

------------------------------

* उचंगी धरणस्थळावर काम बंद पाडण्यासाठी जमा झालेले धरणग्रस्त.

क्रमांक : ०५०२२०२१-गड-११

Web Title: Transfer Bhudargad prefect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.