Kolhapur: एएस ट्रेडर्सच्या तपास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, मुख्य सूत्रधारासह नऊ संशयित अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:37 AM2023-10-10T11:37:16+5:302023-10-10T11:37:58+5:30

सुमारे नऊ कोटीचा मुद्देमाल जप्त

transfer of investigating officers of AS Traders case Kolhapur | Kolhapur: एएस ट्रेडर्सच्या तपास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, मुख्य सूत्रधारासह नऊ संशयित अटकेत

Kolhapur: एएस ट्रेडर्सच्या तपास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, मुख्य सूत्रधारासह नऊ संशयित अटकेत

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स गुन्ह्याचा तपास करणाऱ्या निरीक्षक स्वाती देशमुख यांची पासपोर्ट विभागाकडे बदली झाली. नंदूरबार येथून बदली होऊन आलेले निरीक्षक रवींद्र कळमकर यांची गायकवाड यांच्या जागी नियुक्ती झाली असून, एएस ट्रेडर्स गुन्ह्याचा तपास कळमकर यांच्याकडे सोपवण्यात आला.

कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याबद्दल एएस ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि एजंटचे अटकसत्र सुरू आहे. पोलिस निरीक्षक स्वाती देशमुख यांनी या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्यासह नऊ संशयितांना अटक करून सुमारे आठ ते नऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

गुन्ह्याचा तपास गतिमान झालेला असतानाच, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अचानक गायकवाड यांची पासपोर्ट विभागात बदली केली असून, या जागी रवींद्र कळमकर यांची नियुक्ती केली. कळमकर हे मूळचे अहमदनगर येथील असून, नंदूरबार येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत होते. एएस ट्रेडर्सच्या गुन्ह्याचा अभ्यास करून पसार असलेले अन्य संचालक आणि एजंटचा शोध घेतला जाईल, अशी माहिती तपास अधिकारी कळमकर यांनी दिली.

संचालक दत्तात्रय तोडकर स्वत:हून हजर

या गुन्ह्यातील संशयित दत्तात्रय विश्वनाथ तोडकर (रा. कोडोली, ता. पन्हाळा) हा सोमवारी (दि. ९) स्वत:हून न्यायालयात हजर झाला. पोलिस त्याचा मंगळवारी ताबा घेणार आहेत, अशी माहिती तपास अधिकारी कळमकर यांनी दिली.

नामदेव पाटील याची बँक खाती गोठवली

अटकेतील नामदेव पाटील याच्या मालमत्तांचा छडा लावण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले असून, त्याची दोन बँक खाती गोठवली आहेत. एएसमधून मिळालेल्या पैशातून त्याने जमीन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.

Web Title: transfer of investigating officers of AS Traders case Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.