Kolhapur: यशवंत बँकेत सत्तांतर; अमर पाटील-प्रकाश देसाईंनी एकनाथ पाटील यांचा उडवला धुव्वा 

By राजाराम लोंढे | Published: December 25, 2023 03:57 PM2023-12-25T15:57:48+5:302023-12-25T15:58:02+5:30

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या निवडणूकीत कॉग्रेसचे अमर पाटील-शिंगणापूरकर व ‘जनसुराज्य’ पक्षाचे कोल्हापूर बाजार समितीचे ...

Transfer of power in Yashwant Cooperative Bank at Kuditre kolhapur | Kolhapur: यशवंत बँकेत सत्तांतर; अमर पाटील-प्रकाश देसाईंनी एकनाथ पाटील यांचा उडवला धुव्वा 

Kolhapur: यशवंत बँकेत सत्तांतर; अमर पाटील-प्रकाश देसाईंनी एकनाथ पाटील यांचा उडवला धुव्वा 

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्यानिवडणूकीत कॉग्रेसचे अमर पाटील-शिंगणापूरकर व ‘जनसुराज्य’ पक्षाचे कोल्हापूर बाजार समितीचे संचालक ॲड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकतर्फी विजयी संपादन करत सत्तांतर घडवले. कॉग्रेसचे एकनाथ पाटील यांना नोकरभरतीसह सहा वर्षाचा कारभार भोवल्याने त्यांना स्वताचा पराभवही वाचवता आला नाही.

कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यशवंत बँकेचीनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ‘जनसुराज्य’पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने अमर पाटील, ॲड. प्रकाश देसाई यांनी पॅनेल रिंगणात उतरवले. त्यांना माजी आमदार चंद्रदीप नरके व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे यांनी ताकद दिली. सुरुवातीला एकनाथ पाटील एकाकी पडल्याची चर्चा झाली मात्र, त्यांनी नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवल्याने विरोधकांचा विजयापर्यंत पोहचताना घाम फोडला.

२१ जागांसाठी रविवारी चुरशीने ७० टक्के मतदान झाले, आज सोमवारी शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी झाली. यामध्ये, करवीर तालुक्यातील केंद्रावर विरोधक पुढे राहिले मात्र, पन्हाळा तालुक्यात ते मताधिक्य कमी होऊन सर्वच्या सर्व २१ जागां जिंकत सत्तांतर घडवले.

कोरे, नरकें यांच्यामुळेच सत्तांतर

सत्तारुढ गटाने करवीर तालुक्यात बरोबरीने मतदान घेतले. मात्र, पन्हाळा तालुक्यात आमदार विनय काेरे व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ताकदीने मदत केल्यानेच सत्तांतर झाल्याची चर्चा बँक वर्तूळात आहे.

Web Title: Transfer of power in Yashwant Cooperative Bank at Kuditre kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.