Kolhapur: शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांची तडकाफडकी बदली

By समीर देशपांडे | Published: February 16, 2024 04:24 PM2024-02-16T16:24:43+5:302024-02-16T16:25:10+5:30

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली ...

Transfer of Principal of Shahu Maharaj Government Medical College kolhapur | Kolhapur: शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांची तडकाफडकी बदली

Kolhapur: शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. एस. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोल्हापूरच्या न्यूटन कंपनीने बनावट नोंदणी पत्राच्या आधारे सीपीआर हॉस्पिटलला साहित्य पुरवठा केला होता. हे प्रकरण 'लोकमत'ने उघडकीस आणले. यावरून शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले होते. यानंतर डॉक्टर प्रकाश गुरव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद देण्याची ग्वाही दिली. मात्र सही न करता पोलीस स्टेशनला पत्र दिले होते आणि ते रजेवर गेले होते. यानंतर तिसऱ्याच दिवशी डॉक्टर गुरव यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

त्यांच्या जागी डॉक्टर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून सीपीआर मधील अधिष्ठातापद हे गेल्या अनेक वर्षांपासून संगीत खुर्चीचा खेळ बनला आहे हे निश्चित. न्यूटन कंपनीला कागदपत्रांची छाननी करता दिलेली निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून 'लोकमत'ने हे प्रकरण उघडकीस आणले होते. या विरोधात विविध संघटनांनी निवेदने दिली असून पोलीस कारवाई करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर गुरव यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Web Title: Transfer of Principal of Shahu Maharaj Government Medical College kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.