जिल्ह्यातील ३३ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:51+5:302021-08-29T04:24:51+5:30
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया शुक्रवारी रात्री ...
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया शुक्रवारी रात्री पार पडली. यात २६ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय, तर इतरांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. याची यादी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जाहीर केली.
बदल्यांमध्ये दोन वर्षे पोलीस ठाण्यात सेवा बजावलेल्या उपनिरीक्षकांचा समावेश आहे. प्रशासकीय बदल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील -शाहूपुरी (पूर्वीचे ठिकाण जुना राजवाडा), सुनीता शेळके -शाहूपुरी (लक्ष्मीपुरी), किशोर डोंगरे -स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (लक्ष्मीपुरी), सचिन पांढरे -शाहूवाडी (शाहूपुरी), राहूल वाघमारे -मुरगुड (शाहूपुरी),
समाधान घुगे -गडहिंग्लज (राजारामपुरी), विवेकानंद राळेभात - गांधीनगर (करवीर), अतुल कदम -राजारामपुरी (गांधीनगर), प्रीतम पुजारी -जुना राजवाडा (कागल), किशोर खाडे -कुरुंदवाड (मुरगूड), रविकांत गच्चे -कागल (गोकुळ शिरगाव), प्रियंका सराटे - शाहूवाडी मुदतवाढ , विश्वास कुरणे- शिरोळ (वाचक जयसिंगपूर), सोमनाथ कडवे -शहापूर (इचलकरंजी), रोहन पाटील -शिवाजीनगर (इचलकरंजी), प्रमोद मगर -इचलकरंजी (शिवाजीनगर), भागवत मुळीक - इचलकरंजी (शिवाजीनगर) . गणेश खराडे-हुपरी (शहापूर), राजेंद्र यादव -शहापूर (शिवाजीनगर), नवनाथ सुळ -वडगाव (शिरोळ), नजीर खान - राधानगरी (वडगाव), भाऊसाहेब मलगुंडे -पन्हाळा (वाचक) यांचा समावेश आहे.
नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी -हुपरी, पोलीस उपनिरीक्षक शीतल सिसाळ- गडहिंग्लज, विजय कोळेकर -लक्ष्मीपुरी, गणपती गणेशकर -चंदगड पोलीस ठाण्यात नेमणूक झाली आहे.
विनंती बदल्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले- शाहूपुरी (जुने ठिकाण नियंत्रण कक्ष), उपनिरीक्षक विकास सस्ते- जुना राजवाडा, भाऊसाहेब कर्डीले- गोकुळ शिरगाव, सुरेश साळुंखे - लक्ष्मीपुरी सर्व नियंत्रण कक्ष.), तृप्ती चव्हाण - शिरोली, शीतल जाधव - जयसिंगपूर, मनिषा नारायणकर -करवीर यांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले आहेत.