महापालिका आयुक्तांचा अधिकाºयांना दणका--सहा अधिकाºयांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 10:32 PM2017-10-06T22:32:55+5:302017-10-06T22:35:03+5:30
कोल्हापूर : प्रशासनातील कामकाजाची विस्कटलेली घडी, कामांचा उठाव गतीने होत नसल्याच्या तक्रारी, कर्मचारी संघाचा कामकाजात होत असलेला हस्तक्षेप
भारत चव्हाण / कोल्हापूर : प्रशासनातील कामकाजाची विस्कटलेली घडी, कामांचा उठाव गतीने होत नसल्याच्या तक्रारी, कर्मचारी संघाचा कामकाजात होत असलेला हस्तक्षेप आणि नुकताच झालेला के.एम.टी. बस अपघात या सगळ्यांची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी रात्री तब्बल सहा वरिष्ठ अधिकाºयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. मूळचे डॉक्टर असलेल्या चौधरी यांनी कारभार हाती घेतल्यानंतर प्रथमच तीव्र मात्रा असलेला डोस दिल्याने अधिकारीवर्गात एकच खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी सामान्य प्रशासनातील कर्मचारी संघाचे वर्चस्व पूर्णपणे मोडून काढण्याचाही यातून प्रयत्न केला असल्याचे दिसते.
के.एम.टी.चा अपघात झाल्यानंतर शहरात महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध उफाळून आलेला संताप लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांपासून आयुक्त अभिजित चौधरी यांनी प्रशासनात बदल करून सहा अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता या बदल्यांच्या आदेशावर स'ा करूनच आयुक्तांनी कार्यालय सोडले.
बदली झालेल्यांमध्ये सहायक आयुक्त क्रमांक १ संजय भोसले, कामगार अधिकारी उमाकांत कांबळे, एलबीटी अधिकारी सुधाकर चल्लावाड, विवाह नोंदणी अधीक्षक गीता कारेकर, उपमुख्य लेखापाल सुनील बिद्रे, सामान्य प्रशासन अधीक्षक विश्वास कांबळे यांचा समावेश आहे.
संजय भोसले यांच्याकडील सहायक आयुक्त क्रमांक १, रचना व कार्यपद्धती, सामान्य प्रशासन असे तीन कार्यभार काढून घेण्यात आले असून त्यांना केवळ के.एम.टी.कडील अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक म्हणूनच काम पाहण्यास बजावण्यात आले आहे. कामगार अधिकारी उमाकांत कांबळे यांच्याकडे प्रॉव्हिडंट फंड व विवाह नोंदणी निबंधक म्हणून कार्यभार देण्यात आला आहे.
एलबीटी अधिकारी सुधाकर चल्लावाड यांची या पदावरून उचलबांगडी करून त्यांच्याकडे रचना व कार्यपद्धती, सामान्य प्रशासन व कामगार अधिकारी असे तीन कार्यभार दिले आहेत. विवाह निबंधक गीता कारेकर यांना आता सामान्य प्रशासन विभागाचे सहायक अधीक्षक म्हणून कार्यभार दिला आहे. सामान्य प्रशासनाचे अधीक्षक विश्वास कांबळे यांची बदली विभागीय कार्यालय क्रमांक १ मधील घरफाळा अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. उपमुख्य लेखापाल सुनील बिद्रे यांना एलबीटी अधिकारी करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागात कर्मचारी संघाचा सतत हस्तक्षेप होत असतो, तो अधिकाºयांच्या बदल्यांच्या माध्यमातून मोडून काढण्यात आला आहे. यापूर्वी आयुक्त चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्यापासून अनेक अधिकाºयांना कामातील दिरंगाईबद्दल ‘कारणे दाखवा नोटिसा’ दिल्या आहेत. तरीही अधिकाºयांच्या मानसिकतेत बदल होत नाही म्हटल्यावर बदल्यांचे अस्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.