सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:34+5:302020-12-12T04:40:34+5:30
कुरुंदवाड : सहकारी संस्था शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलू शकतात, इतकी ताकद सहकारामध्ये आहे. धनपाल आलासे यांनी ...
कुरुंदवाड : सहकारी संस्था शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलू शकतात, इतकी ताकद सहकारामध्ये आहे. धनपाल आलासे यांनी सहकारी संस्था उभ्या करून आदर्शवत कारभारातून इतरांच्या समोर आदर्श ठेवला आहे, तो प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास सेवा संस्थेचे सभागृह व शेतकरी सहकारी बहुउद्देशीय शेतीमाल उत्पादन प्रक्रिया संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, दादासो पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष पाटील, संस्थेचे संस्थापक धनपाल आलासे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, शरद आलासे, नगरसेवक फारूक जमादार, किरणसिंह जोंग, दीपक गायकवाड, जिन्नाप्पा भबीरे, अरुण आलासे, लक्ष्मण चौगुले, आप्पासाहेब बडबडे, जयपाल कुंभोजे, सुभाषसिंग राजपूत, किरण आलासे, दत्ता गुरव, रमेश भुजुगडे, तानाजी आलासे, रघु नाईक, दौलत कांबळे, अभिजित पवार उपस्थित होते. संचालक मोनाप्पा चौगुले यांनी आभार मानले.
फोटो - १११२२०२०-जेएवाय-०९
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे आयोजित कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले.