पोलिसांचे ‘बिºहाड’ दोन वर्षाला बदलणार बदलीचा नवा अध्यादेश; पोलिसांमधून नाराजी
By Admin | Published: May 11, 2014 12:31 AM2014-05-11T00:31:21+5:302014-05-11T00:45:42+5:30
गणेश शिंदे (कोल्हापूर) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’असे ब्रीदवाक्य असलेले व २४ तास जनतेच्या सदैव रक्षणात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी
गणेश शिंदे (कोल्हापूर) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’असे ब्रीदवाक्य असलेले व २४ तास जनतेच्या सदैव रक्षणात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात बदल्यांच्या नव्या अध्यादेशामुळे नाराजी निर्माण झाली आहे. या नव्या अध्यादेशामध्ये एकाच उपविभागीय पोलीस विभागात आता चार वर्षे सेवा करण्याचा नियम राज्य शासनाने केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहा उपविभागीय कार्यालये आहेत. यातून पोलीस कर्मचार्यांची जिल्हाअंतर्गत २४ वर्षे सेवा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. निम्मे पोलीस ठाणे रिकामे होणार या नव्या अध्यादेशामुळे पोलीस ठाण्यातील सुमारे ७० ते ८० टक्के पोलीस कर्मचारी रिकामे होणार आहेत. जिल्ह्यात सुमारे २४०० पोलीस कर्मचारी आहेत. पूर्वी एकाच पोलीस ठाण्यातील कर्मचार्याला सहा वर्षे सेवा बजावावी लागत होती. आता हे चित्र बदलणार आहे. पोलीस महासंचालक यांनी या आदेशाला स्थगितीची मागणी कोणत्याही पोलीस अधिकार्याला प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी सहा वर्षांची सेवा करता येत होती. तसेच एखाद्या पोलीस निरीक्षकाला दोन पोलीस ठाण्यांचा पदभार मिळत असे. मात्र, नव्या अध्यादेशामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकाला दोन वर्षे सेवा करता येणार आहे. या दोन वर्षांच्या अध्यादेशासाठी जिल्हा पोलीस प्रशासन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी या अद्यादेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांतून होत आहे. १५ मेपर्यंत विनंती अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी काल (शुक्रवार) सायंकाळी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला, ज्या पोलीस कर्मचार्यांची त्या पोलीस ठाण्यात ३१ मे २०१४ पर्यंत मुदत होत आहे, त्यांनी १५ मे २०१४ पर्यंत विनंती अर्ज करावेत, असे सांगितले आहे. त्या पोलीस कर्मचार्यांनी विनंती अर्जामध्ये तीन पोलीस ठाण्यांची पसंती दर्शवावी, असे सांगितले आहे. एका विभागात चार वर्षेच सेवा जिल्ह्यात करवीरसह शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, शाहूवाडी व जयसिंगपूर अशी उपविभागीय कार्यालये आहेत. सध्या शहर, करवीर, गडहिंग्लज या तीन विभागांचा पोलीस उपअधीक्षक पदाचा भार दुसर्या अधिकार्यांकडे आहे. समजा, शहर विभागातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एखाद्या पोलीस कर्मचार्याची चार वर्षे सलग सेवा झाली तर त्याला बदलीसाठी इतर विभागाकरिता अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे त्या कर्मचार्याला जुना राजवाडा पोलीस ठाणे, शाहूपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांत सेवा करण्याच्या संधीपासून मुकावे लागणार आहे.