वाहतूक शाखेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीस १५ हजार शेणी सुपूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:08+5:302021-05-12T04:26:08+5:30

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर प्रचंड ताण पडत आहे. तेथे अंत्यसंस्कारासाठी शेणी, लाकूड ...

Transport Branch hands over 15,000 shanis to Panchganga Cemetery | वाहतूक शाखेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीस १५ हजार शेणी सुपूर्त

वाहतूक शाखेतर्फे पंचगंगा स्मशानभूमीस १५ हजार शेणी सुपूर्त

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर प्रचंड ताण पडत आहे. तेथे अंत्यसंस्कारासाठी शेणी, लाकूड आदी साहित्य अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे एक छोटासा हातभार म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस १५ हजार शेणी सुपूर्त केल्या.

कोल्हापुरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वर्गणी स्वरूपात निधी जमा केला. जमा केलेल्या रकमेतून सुमारे १५ हजार शेणी (गोवाऱ्या) खरेदी करून मंगळवारी पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त केल्या.

यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, पोलीस उपनिरीक्षक मधु चौगुले यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

फोटो नं. ११०५२०२१-कोल-पोलीस०१

ओळ :

कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीस शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मंगळवारी १५ हजार शेणी सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पो. नि. स्नेहा गिरी, उपनिरीक्षक मधू चौगुले आदी उपस्थित होते.

===Photopath===

110521\11kol_3_11052021_5.jpg

===Caption===

ओळ : कोल्हापूरातील पंचगंगा स्मशानभूमीस शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्यावतीने मंगळवारी १५ हजार शेणी सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पो. नि. स्नेहा गिरी, उपनिरीक्षक मधू चौगुले आदी उपस्थित होते.

Web Title: Transport Branch hands over 15,000 shanis to Panchganga Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.