वीजनिर्मितीसाठी कागलमध्ये कचऱ्याची आयात

By admin | Published: January 12, 2017 01:10 AM2017-01-12T01:10:16+5:302017-01-12T01:10:16+5:30

इतरांसाठी अनुकरणीय : प्रकल्पासाठी बाहेरुन आणला जातो दररोज दीड टन कचरा

Trash imports in Kagal for electricity generation | वीजनिर्मितीसाठी कागलमध्ये कचऱ्याची आयात

वीजनिर्मितीसाठी कागलमध्ये कचऱ्याची आयात

Next

कागल : रोज तयार होणारा कचरा साठवायचा कोठे? तो गोळा कसा करायचा? त्याची निर्गत कोठे आणि कशी करायची, याबद्दल मोठमोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था चिंतेत आहेत. कागल नगरपालिकेने मात्र घनकचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू करून कचऱ्याचे डोंगर होण्यापासून बचाव केला आहे. तसेच हा इतर शहरासमोर आदर्श निर्माण केला आहे.
वीजनिर्मीतीसाठी कागलला प्रत्येक्षात कचऱ्याचीच टंचाई भासू लागल्याने त्यांनी कागलबाहेरुन महामार्गावरील हॉटेल, पंचतारांकित औद्योगिक वसाहत आदी ठिकाणाहून कचरा उपलब्ध केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची दखल केंद्र आणि राज्य सरकारनेही घेतली आहे. कागल नगरपालिकेचा कचरा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहण्यासाठी देशभरातून अधिकारी, प्रतिनिधी भेट देत आहेत.
२०१५ पासून हा वीज निर्मितीचा प्रकल्प कागलमध्ये कार्यरत आहे.
हा वीजनिर्मिती प्रकल्प प्रामुख्याने ओल्या कचऱ्यापासून होता. या प्रकल्पापूर्वीही गांडूळ खत, कचरा उठाव, घंटागाडी यासारखे उपक्रम राबविले होते. यामुळे मंत्रालयीन पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागलला देण्याबद्दल आमदार मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी १०० टक्के अनुदान म्हणून साडेतीन कोटी रुपये मंजूर केले. रासायनिक प्रक्रियेतून गॅसनिर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती असे या प्रकल्पाचे सूत्र आहे. यातून राहणाऱ्या वेस्टेजपासून चांगले खत तयार होते. तसेच जो कुजणारा कचरा नाही, पण विद्युत विघटन होते, तो कचरा नष्ट केला जातो. तसेच कचऱ्यातून मिळणाऱ्या काही वस्तू घटकावर प्रक्रिया किंवा पुनर्वापर करण्यासाठी कागल परिसरातील १५ ते २० भंगार गोळा करणारे येथे येतात. त्यांना नगरपालिकेने काही सुविधा दिल्या आहेत. अशा पद्धतीने १०० टक्के कचऱ्याची निर्गत किंवा विल्हेवाट येथे लावली जाते. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनंतर केवळ कागलमध्ये आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकेत देशात हा एकमेव प्रकल्प आहे. (प्रतिनिधी)


वीज प्रकल्पासाठी कागलबाहेरील हायवेलगतची हॉटेल्स, बाजारपेठा, पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथूनही सरासरी एक ते दीड टन ओला कचरा आणला जातो.
आरोग्य विभागाकडे ८० कर्मचारी, नऊ वाहने
ओला-सुका कचरा भरून ठेवण्यासाठी सात हजार घरांना १४ हजार बकेट पुरवठा
मात्र, अजून नागरिकांच्यात जनजागृतीची गरज; कचरा एकत्रच भरला जातो आणि बकेटचा इतर कामांसाठी वापर होत आहे.

Web Title: Trash imports in Kagal for electricity generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.