कचरावेचक मुलांनी केला आनंदोत्सव साजरा

By admin | Published: April 24, 2017 07:03 PM2017-04-24T19:03:10+5:302017-04-24T19:03:10+5:30

२१८ जणांना मॅट्र्ीकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ; अवनि संस्थेचा पाठपुरावा

The trash kids celebrated the celebration | कचरावेचक मुलांनी केला आनंदोत्सव साजरा

कचरावेचक मुलांनी केला आनंदोत्सव साजरा

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २४ : शहरातील २१८ कचरा वेचक कुटुंबातील मुला-मुलींना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचा लाभ मिळाल्याबद्दल सोमवारी दुपारी दसरा चौक येथे अवनि संस्थेच्यावतीने मुलांसोबत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, जिल्हा परिषद समाजकल्याण निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

अवनि संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील राजेंद्रनगर, यादवनगर, संभाजीनगर, फुलेवाडी, विचारेमाळ, कात्यायनी कॉम्प्लेक्स, दौलतनगर, टिंबर मार्केट, मुडशिंगी, वडणगे, रजपूतवाडी, बालिंगा, कुरुकली, सांगरूळ, गर्जन, शिरोली, पडळ, पेठवडगाव या वस्तीमधील कचरावेचकांच्या मुला-मुलींना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत कचरावेचक कुटुंबाच्या मुला-मुलींना २०१५ ते २०१६ सालासाठी ४६ जणांना तर २०१६-१७ सालासाठी २१८ मुला-मुलींना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा मंजूर केली.

अवनि संस्थेच्यावतीने या मुलांच्या सोबत आज आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, मन्सूर पटवेगार, वनिता कांबळे, कोमल कांबळे, लता अर्दाळकर, सविता गोसावी, विद्या सोनवले, अनिता कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: The trash kids celebrated the celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.