जिल्ह्यात ३८१ काेरोना रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:17+5:302021-03-05T04:24:17+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असली तरी ती आटोक्यात असल्याचे दिसत आहे. मात्र, अन्य जिल्ह्यांतील ...
कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असली तरी ती आटोक्यात असल्याचे दिसत आहे. मात्र, अन्य जिल्ह्यांतील चित्र पाहता कोल्हापूरकरांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ३८१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या वर्षभरात ५० हजार ५८१ वर गेली असून, त्यापैकी ४८ हजार ४५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकूण १७४५ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
गुरुवारी दिवसभरात २८ नवीन रुग्णांची भर पडली. त्यापैकी १३ रुग्ण कोल्हापूर शहरातील, तर करवीर, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज तालुक्यांतील प्रत्येकी दोघा रुग्णांचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील एक रुग्ण आहे, तर १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
शासकीय प्रयोगशाळेत १०२ व्यक्तींच्या कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी १३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे, तर खासगी शाळेत २६७ व्यक्तींची चाचणी झाली. त्यामध्ये १५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.