सीपीआरमध्ये आता हिमोफेलियावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:25+5:302021-08-17T04:29:25+5:30

मंत्री पाटील म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी या आजारावर उपचार करण्यात येतात अशा १० ठिकाणची माहिती देण्यात यावी. त्यामुळे ...

Treatment of hemophilia now in CPR | सीपीआरमध्ये आता हिमोफेलियावर उपचार

सीपीआरमध्ये आता हिमोफेलियावर उपचार

Next

मंत्री पाटील म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी या आजारावर उपचार करण्यात येतात अशा १० ठिकाणची माहिती देण्यात यावी. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणे सोईचे होईल. सध्या जिल्ह्यात या आजाराच्या २०० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून त्या अनुषंगाने आरोग्य मंत्र्यांचीही भेट घेऊ.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी या आजाराच्या रुग्णांसाठी सीपीआरमध्ये १० कायमस्वरूपी बेड राखीव ठेवण्यात आल्याचे सांगितले. सीपीआर, हिमोफेलिया सोसायटी, हिमोफेलिया फेडरेशन, नवी दिल्ली यांच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी डॉ. वरुण बाफणा, डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. मोहन पाटील, डॉ. मोहन बर्गे यांच्यासह सीपीआरमधील डॉक्टर्स, हिमोफेलिया सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

----

फोटो १६०८२०२१-कोल-हिमोफोलिया

ओळ : कोल्हापुरातील सीपीआरमध्ये रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हिमोफेलियावरील इंजेक्शनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह सीपीआरमधील अधिकारी, डॉक्टर्स उपस्थित होते.

--

Web Title: Treatment of hemophilia now in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.