धामोड येथील 'लंपी ' सदृश्य जनावरांवर उपचार सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:46 AM2020-11-19T11:46:05+5:302020-11-19T11:48:45+5:30

medical, farmar, kolhapurnews धामोड ता . राधानगरी येथील नऊ नंबर व कुंभारवाडी या दोन गावांमध्ये लंबी सदृश्य आजाराची चार जनावरे सापडली होती . त्या बाधित जनावरांना ताप,अंगावरती पुरळ, अशक्तपणा अशी लक्षणे दिसत होती . हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर जनावरांना ही त्याचा धोका आहे . त्यामुळे पशु पालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती . पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन गावांना भेट देऊन बाधित जनावरांची तपासणी केली व बाधित जनावरांवरती उपचार करण्यास सुरुवात केली आहे.  या उपचार पद्धतीला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Treatment started on 'Lampi' like animals at Dhamod! | धामोड येथील 'लंपी ' सदृश्य जनावरांवर उपचार सुरू !

धामोड येथील 'लंपी ' सदृश्य जनावरांवर उपचार सुरू !

Next
ठळक मुद्देधामोड येथील 'लंपी ' सदृश्य जनावरांवर उपचार सुरू !पशुधन विकास अधिकारी व पर्यवेक्षकांची भेट

धामोड : (ता . राधानगरी ) येथील नऊ नंबर व कुंभारवाडी या दोन गावांमध्ये लंबी सदृश्य आजाराची चार जनावरे सापडली होती . त्या बाधित जनावरांना ताप,अंगावरती पुरळ, अशक्तपणा अशी लक्षणे दिसत होती . हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर जनावरांना ही त्याचा धोका आहे . त्यामुळे पशु पालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती . पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन गावांना भेट देऊन बाधित जनावरांची तपासणी केली व बाधित जनावरांवरती उपचार करण्यास सुरुवात केली आहे.  या उपचार पद्धतीला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरातील नऊ नंबर व कुंभारवाडी या दोन गावातील जवळपास चार जनावरांना लंपी सदृश्य आजाराची लागण झाली होती . या बातमीने कोल्हापूर पशुवैद्यकीय विभाग खडबडून जागे झाला . हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची तीव्रता लक्षात घेऊन पशुधन विकास अधिकारी एन डी पोवार व धामोड पशुधन श्रेणी एकचे पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर अनिल शिंदे यांनी बाधित जनावरांना तात्काळ भेट दिली . व बाधित जनावरांना अँन्टीबायोटिक औषधे देऊन त्यांची शुश्रुषा केली . या उपचार पद्धतीला जनावरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले .

"हा आजार संसर्गजन्य असल्याने पशुपालकांनी स्वतःच स्वतःच्या जनावरांची काळजी घेऊन बाधित जनावरांना ' अलगीकरणात ' ठेवल्यास इतर जणावरांना त्याचा धोका होणार नाही . "

बाधित जनावरांवर योग्य पद्धतीचे उपचार सुरू असून पशुपालकांनी चिंता करण्याची गरज नाही . या आजाराबाबत फार भीती न बाळगता जनावरांची योग्य देखभाल व औषधोपचार केल्यास जनावर यातून पूर्णपणे बरे होऊ शकते .
- एन.डी . पोवार,
पशुधन विकास अधिकारी,राधानगरी 
 

 

Web Title: Treatment started on 'Lampi' like animals at Dhamod!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.