कोल्हापूरात ऐतिहासिक शिवाजी मंदिरावर झाड कोसळले, मंदिराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:49 PM2019-08-03T16:49:32+5:302019-08-03T16:53:33+5:30

कोल्हापूर येथील नर्सरी बागेतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरावर शनिवारी झाड कोसळल्याने मंदिराच्या वरील भागाचे मोठे नुकसान झाले. कोसळलेले झाड धोकादायक असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे अखेर हे झाड मंदिरावर पडले आणि त्याचे नुकसान झाले.

Tree fell on historic Shivaji temple in Kolhapur, damage to temple | कोल्हापूरात ऐतिहासिक शिवाजी मंदिरावर झाड कोसळले, मंदिराचे नुकसान

 कोल्हापुरातील नर्सरी बागेतील एक झाड शनिवारी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरावर कोसळले आणि मंदिराचे मोठे नुकसान झाले. छाया : आदित्य वेल्हाळ

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूरात ऐतिहासिक शिवाजी मंदिरावर झाड कोसळले, मंदिराचे नुकसान नर्सरी बागेतील प्रकार : अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

कोल्हापूर : येथील नर्सरी बागेतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरावर शनिवारी झाड कोसळल्याने मंदिराच्या वरील भागाचे मोठे नुकसान झाले. कोसळलेले झाड धोकादायक असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे अखेर हे झाड मंदिरावर पडले आणि त्याचे नुकसान झाले.

सीपीआर चौक ते सोन्या मारुती चौक दरम्यान असलेल्या नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी तसेच ताराराणी यांचे मंदिर १९१७ साली दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराज यांनीच बांधली आहेत. या मंदिराच्या परिसरात काही झाडे वाढली आहेत. त्यांची योग्य देखभाल न घेतल्यामुळे ती कशीही वाढलेली आहेत. त्यातील दोन झाडे पडण्याची स्थितीत होती.

शुक्रवारी आयुक्तांनी क ार्योत्तर मंजूर दिली होती. तोपर्यंत शनिवारी सकाळी झाड मंदिरावर कोसळले. झाड मंदिरावर कोसळल्याने मंदिराच्या वरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दगडी मंदीरावरील भागात एक मजला असून त्याच्या कौलांचे तसेच जुन्या खापऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले.
झाड कोसळल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेने लगेच तेथे धाव घेतली. जेसीबी, कटरच्या सहाय्याने कोसळलेले झाड बाजूला केले. शिवाय तेथील आणखी एक झाड काढून टाकण्यात आले.

 

 

Web Title: Tree fell on historic Shivaji temple in Kolhapur, damage to temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.