गिरगाव परिसरात वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:11+5:302021-04-25T04:24:11+5:30
भुदरगड तालुक्यातील निसर्गसंपन्न गिरगाव शेजारील तमाशाचा खडक परिसरातील वनक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाने ...
भुदरगड तालुक्यातील निसर्गसंपन्न गिरगाव शेजारील तमाशाचा खडक परिसरातील वनक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाने नटलेला परिसर उजाड होण्याच्या मार्गावर आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
फये-हेदवडे-गिरगाव परिसर येथे पर्यटक येथे भेट देतात, पण निद्रीस्त वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे राजरोस वृक्षतोड सुरू आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, पण दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड झाल्याने निसर्गसंपन्न परिसर उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर घटनेमुळे निसर्गप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वृक्षतोडीमुळे परिसर उजाड होण्याची भीती निर्माण झाली आहे. राजरोस तोड होत असल्यामुळे निसर्गप्रेमी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गिरगावजवळील तमाशाचा खडक परिसरात येथे तोडलेल्या लाकडाचे ढीग टाकले आहेत. वृक्षतोड करून निसर्गसंपन्न परिसर उजाड बनविणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे.
--
फोटो ओळ
२४गिरगाव ट्री
गिरगाव परिसरात वृक्षतोड