माळवाडी येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:37+5:302021-06-06T04:18:37+5:30
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील गायरानामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते के. पी. खोत यांच्या संकल्पनेतून ...
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील गायरानामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते के. पी. खोत यांच्या संकल्पनेतून भारतीय जातीची ५० झाडे लावण्यात आली. या ठिकाणी एक हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. फणस, पिंपळ, वड, चिंच, अशी देशी झाडे लावण्यात आली असून, या झाडांचे संगोपन करण्यासाठी खोत स्वखर्चाने या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवणार आहेत. उपक्रमासाठी कोल्हापूर येथील १९९२ साली दहावीत शिकणार्या प्रायव्हेट हायस्कूलमधील खोत यांच्या वर्गमित्रांचेदेखील सहकार्य लाभले. या वेळी सरपंच महिपती चौगले, सुनील खोत, संतोष खोत, विशाल खोत, नितीन खोत, अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.
०५ माळवाडी वृक्षारोपण
फोटो : माळवाडी (ता. पन्हाळा) येथे गायरानामध्ये एक हजार झाडे लावण्याची सुरुवात करण्यात आली. या वेळी सरपंच महिपती चौगले, के. पी. खोत, संतोष खोत आदी.