वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:36 PM2019-04-16T23:36:11+5:302019-04-16T23:36:17+5:30

भारत पाटील ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ संत तुकाराम यांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा ...

Tree vine is ours, weeds! | वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे!

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे!

googlenewsNext

भारत पाटील
‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे! पक्षी ही सुस्वरे, आळविती!’ संत तुकाराम यांनी मानवाच्या जीवनामध्ये वृक्ष किती महत्त्वाचा आहे हे गाथेमध्ये सांगितले आहे. ‘झाडे तो लेकुरें आपुली! लेकरासारखी जपावी!’ असं छत्रपती शिवाजी महराज यांना वाटत होतं. आपण स्वतंत्र भारताचे सुधारलेले नागरिक आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला कधी अथर्पूणर्ता येईल? जेव्हा स्वच्छता, पर्यावरण समृद्धी आणि स्वयंपूर्णत: येईल त्यावेळी. आपल्या पूर्वजांनी आदर्श विकसित समाजाची स्वप्नं बघितली होती, यासाठी त्यांनी आपलें सगळे आयुष्य वेचले होते. त्यांनी दिलेल्या कृतिशील विचारांच्या शिदोरीवर आपण आज आपली गावे व आपला समाज समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. ‘राष्ट्र आपणाला काय देतं? यापेक्षा आपण राष्ट्राला काय देतो?’ हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती पर्यावरण व निसर्गाला आपला बंधू, सखा व देव मानणारी पवित्र संस्कृती आहे आणि याच पवित्र संस्कृतीतील खेड्यांत, शिवारात राहणारी व या मातीत घाम गाळून स्वत:ला घडविणारी आपण सारी माणसं आहोत. निसर्गाने आपणाला भरभरून दिले आहे; परंतु आपण मात्र निसर्गाची किती काळजी करतो? ‘आपल्या कर्म दरिद्रीपणामुळे आपण साऱ्यांनी पर्यावरणाची वाट लावली आहे.’ यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. निसर्गचक्र उद्ध्वस्त केले आहे. यामुळे सगळे मानवी जीवन संकटात आले आहे. पाणी, हवा, ग्लोबल वॉर्मिंग व प्रदूषण या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ‘एक झाड आपणाला काय काय देते? याचा मात्र आपण कधीही विचार करीत नाही.’ झाड आपणाला आॅक्सिजन देते व हा प्राणवायू आपणाला आजूबाजूला असलेल्या झाडांपासून फुकट मिळत असतो. यामुळे आपणाला त्याची अजिबात किंमत वाटत नाही. म्हणूनच आपण झाडांची बेसुमार कत्तल करीत सुटलो आहोत. झाडे लावण्यापेक्षा आपणाला ती तोडण्यातच आनंद वाटत आहे. या चुकीच्या मानसिकतेमुळे आज समस्त मानव जात धोक्यात आली आहे. झाड म्हणजे एक गाव असते. असंख्य फांद्यांवर अगणित पाने व फुले जशी गुण्यागोविंदाने नांदतात, एक पान दुसºया पानासंगे कधीही भांडत नाही. ‘एका झाडाचे खोड कधी दुसºया खोडाशी कोर्ट कज्जा खेळत नाही.’ हेच झाड आपणाला सावली देताना बाप असतं. फळ देताना ते आई होतं. पक्षांना आसरा देतं, तर माणसाच्या पिढ्यान्पिढ्या सातत्याने जगवत आहे. झाड आपणाला फळे, फुले, लाकूड, निवारा, औषधे, पाऊस, सावली तर देतच आहे; पण आई-बापाचे प्रेम व संस्कृती सुद्धा झाड आपणाला देत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी टिकवून आपली तहान पण भागवत आहे. भविष्यातील या संकटाला सामोरे जात असताना आपण साऱ्यांंनी ‘पर्यावरण समतोल व निसर्गचक्र याविषयी सर्वांची जशी आई मुलांचे संगोपन करते. त्या भावनेने आपण प्रत्येक मनुष्याने झाडांचे संगोपन केले पहिजे.’ अजूनही पन्हाळ्याच्या दोन्ही बांधारीमधील राक्षी, निकमवाडी, धबधबेवाडी, सोमवारपेठ, इंजौळे, खडेखोल, दळवेवाडी, बंदिवडे, करंजफेण व पलीकडील बुधवारपेठ, नेबापूर, आपटी, जेऊर, वेखंडवाडी, बादेवाडी, बोरिवडे परिसरामध्ये भरपूर झाडं लावली पाहिजेत, असे मला वाटते. यामुळे बºयाच समस्या सुटतील. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे हे तेथील सर्वसामान्य लोकांच्या हिताचे आहे, असे मला वाटते. २00५/६ मध्ये पाऊस खूप झाला होता. ‘त्यावेळी बुधवारपेठपासून मसाई पठारपर्यंत 3 इंचांपासून ते 3.५ मीटरपर्यंतच्या भेगा पडल्या होत्या.’ आपटी गावात तलावाशेजारी जमिनीचे भूस्खलनही झाले होते. त्यात बºयाच घरांचे नुकसान झाले होते. त्यावेळी सरपंच विश्वास पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती. नावली पैकी धारवाडी येथे जमीन घसरली होती. तसेच मराठवाडी व केकतवाडी येथील डोंगर सरकला होता. यामुळे तेथील लोकांचे वास्तव्यच धोक्यात आले होते. या दोन्ही वाड्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली होती. तशी ही पन्हाळा व दोन्ही बांधारींसाठी धोक्याची घंटा आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, विकास देशमुख, तहसीलदार समीर शिंगटे व माझी सगळी पंचायत समिती आणि जिआॅलॉजिस्ट्स मोरे यांचे खूप मोठे सहकार्य झाले होते. नैसर्गिक आपत्तीवेळी अधिकारी व लोकप्रतिनिधी मनापासून एक होऊन काम करण्याचा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. ‘ग्रामपंचायतमध्ये आता वृक्षांची नोंदवही ठेवलीच पहिजे. प्रत्येक गावात गाव तिथे रोपवाटिका निर्माण केली पहिजे.’ दरवर्षी गावात दरमाणशी झाडं लावली पाहिजेत.
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती
चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)

Web Title: Tree vine is ours, weeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.