पन्हाळ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:19 AM2018-11-12T00:19:11+5:302018-11-12T00:19:17+5:30
पन्हाळा : दिवाळी सुट्टीत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळा पर्यटकांच्या ...
पन्हाळा : दिवाळी सुट्टीत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळा पर्यटकांच्या गर्दीने भरून गेला आहे. पर्यटकांच्या शिस्तीसाठी १०० पोलिसांची कुमक दाखल झाली आहे. तीन दरवाजा, सज्जा कोटी, लता मंगेशकर बंगला परिसरात पर्यटकांची रेलचेल आहे.
पर्यटकांच्या गदीर्मुळे गडावरील हॉटेल हाऊसफुल्ल आहेत, तर लहान-मोठ्या हॉटेलनाही सुगीचे दिवस आले आहेत. तसेच छोटा-मोठा व्यवसाय करणारे व्यावसायिकसुद्धा खुशीत आहेत. पर्यटकांना गाडी पार्किंगची व्यवस्था नसल्याने मात्र पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. पर्यटकांचे चालू हंगामातील आकर्षण ठरणारी ‘लंडन बस’ विविध प्रकारे प्रवाशांना घेऊन शहरात फेरफटका मारत असून, पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. नगरपालिका प्रवासी कराच्या माध्यमातून लाखोंचा कर गोळा करत आहे. त्यातून पर्यटकांना स्वच्छतागृह, पायाभूत सुविधा, वाहनतळ अशा सुविधा कराव्यात, अशी मागणी पर्यटकांमधून होत
आहे.