कागल तालुक्यात सोयाबीन पिकाकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:24+5:302021-07-23T04:15:24+5:30
कागल तालुक्यातील शेतकरी आता उसाबरोबरच सोयाबीन पिकाकडेही वळू लागला आहे. यंदा तालुक्यातील एकूण पीक क्षेत्रापैकी ७६ टक्के क्षेत्रात ...
कागल तालुक्यातील शेतकरी आता उसाबरोबरच सोयाबीन पिकाकडेही वळू लागला आहे. यंदा तालुक्यातील एकूण पीक क्षेत्रापैकी ७६ टक्के क्षेत्रात ऊस आणि सोयाबीन पिके आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गाने पुढे मागे करीत पेरण्या पूर्ण केल्या. जलसिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सरीत पाणी सोडून भुईमुग, सोयाबीन बियाणे टोकणले आहेत. आडसाली ऊस लागणी ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहेत. पेरणी झालेली सर्व पिके चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे चित्र आहे.
चौकट : तालुक्यातील पीक क्षेत्र
एकुण क्षेत्र : 42770 हेक्टर ऊस : 25930 हेक्टर, सोयाबीन : 8481 हेक्टर, भात :5347 हेक्टर, भुईमूग : 2215 हेक्टर ,
कडधान्य= 552 हेक्टर