‘भोगावती’साठी तिरंगी लढत
By admin | Published: April 11, 2017 01:24 AM2017-04-11T01:24:21+5:302017-04-11T01:24:21+5:30
नाट्यमय घडामोडी; महाआघाडीतही गोंधळ; २१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तिरंगी लढत निश्चित झाली. कॉँग्रेस, महाआघाडी व सदाशिवराव चरापले यांची परिवर्तन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. ४८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने २१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे प्रा. किसन चौगुले व रघुनाथ जाधव यांनी ऐनवेळी माघार घेऊन नेत्यांना धक्का दिला.
‘भोगावती’साठी काँग्रेसने रविवारी रात्री सर्वप्रथम पॅनेलची घोषणा करून आघाडी घेतली होती तर महाआघाडीचा घोळ सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता.
भोगावती/कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ७४ एवढे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ५६० पैकी ४८६ एवढ्या प्रचंड संख्येने उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे. या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार हे निश्चीत झाले आहे.
सोमवारी राष्ट्रवादी काँंग्रेसची चांगलीच नाचक्की झाली. सुरुवातीला काँग्रेसच्या मागे धावणाऱ्या राष्ट्रवादीने शनिवारपासून काँंग्रेसविरोधी शे. का. पक्ष, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, यांना बरोबर घेऊन महाआघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आघाडी करून उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेल्या दुसऱ्या मिनिटाला राष्ट्रवादीचे राधानगरी तालुका अध्यक्ष किसन चौगले आणि रघुनाथ जाधव यांनी उमेवारी मिळाली असताना ती नाकारून उमेदवारी अर्ज माघारी घेतले व आपल्याच पॅनेलला घरचा आहेर दिला. एवढ्यावर हा गोंधळ थांबला नाही, जे दिग्गज नामदेव पाटील, हंबीरराव पाटील, राजू कवडे, शिवाजी पाटील, अविनाश पाटील, संजय कलिकते आदींना उमेदवारी मिळाली नाही, त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला. आघाडीने उमेदवारी नाकारलेच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोर दबाव गट तयार करण्याची हालचाल सुरू असून, यात नाराज असणाऱ्या या मंडळींच्याकडून येत्या चार दिवसांत आपली भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. राष्ट्रवादीत ही परिस्थिती असताना काँग्रेसमध्येदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे. नवीन चेहऱ्याच्या प्रयत्नात पी. एन. पाटील यांनी आठजणांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. यातून काहीजणांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. माघारी मोठ्या होणार याचा अंदाज असल्याकारणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अत्यंत योग्य नियोजन लावल्यामुळे माघारीची प्रक्रिया सुलभपणे पार पडली. आज (मंगळवार) ११ वाजता उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहेत.
तिरंगी लढत : मोर्चेबांधणी सुरू
भोगावती : ‘भोगावती’च्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित झाली असून, काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी महाआघाडीच्या वतीने व सदाशिव चरापले यांच्या भोगावती परिवर्तन आघाडीच्या वतीने उमेदवार पॅनल जाहीर केले.
महाआघाडीचे उमेदवार असे : कौलव गट- धैर्यशील आनंदराव पाटील-कौलवकर, विनोद विश्वास पाटील (ठिपकुर्ली), पांडुरंग विठ्ठल डोंगळे (घोटवडे), राशिवडे गट- तानाजी बंडोपंत ढोकरे (राशिवडे), बंडोपंत भाऊ किरुळकर (घुडेवाडी), संजय महादेव डकरे (राशिवडे), कसबा तारळे - शिवाजी भिकू पाटील (गुडाळ), दत्तात्रय हनमा पाटील (तारळे), कुरुकली गट -जनार्दन गुंडू पाटील (परिते), केरबा भाऊ पाटील (कोथळी), बबन शंकर पाटील (कुरुकली), सडोली गट- अशोकराव दिनकर पाटील (सडोली), सुरेश ज्ञानदेव चौगले (आरे), हसूर गट- रघुनाथ बापू पाटील (बाचणी), शामराव बाबूराव पाटील (भाटणवाडी).
महिला प्रतिनिधी : मीनाक्षी मोहन पाटील (आणाजे), वंदना वसंतराव पाटील, मागासवर्गीय प्रतिनिधी अण्णाप्पा गणपती कांबळे (पुंगाव), भटक्या विमुक्त जाती बाबूराव सत्याप्पा हजारे (वाशी), संस्था गट : महेश बाजीराव वरूटे (आरे), इतर मागास गट : सुभाष पांडुरंग जाधव (शिरगाव),