खराब रस्त्याला ‘श्रद्धांजली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:38+5:302021-02-14T04:22:38+5:30

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरिकांनी शनिवारी येथील खराब झालेला रस्ता करण्यासाठी अनोखे आंदोलन केले. रस्त्याच्या मध्येच ‘दु:खद ...

'Tribute' to bad roads | खराब रस्त्याला ‘श्रद्धांजली’

खराब रस्त्याला ‘श्रद्धांजली’

Next

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरिकांनी शनिवारी येथील खराब झालेला रस्ता करण्यासाठी अनोखे आंदोलन केले. रस्त्याच्या मध्येच ‘दु:खद निधन, रस्ता मृत्यू पावला आहे,’ असा फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या फलकाची चर्चा परिसरात सुरू आहे.

फुलेवाडी रिंग रोडवरील खराब रस्ता नव्याने करण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जुना रिंग रोड अद्यापही तसाच खड्डे पडलेल्या अवस्थेत आहे. अरुण सरनाईकनगर, कणेरकरनगर, लक्ष्मीबाई साळुंखे कॉलनी, निचितेनगर या चार ते पाच मोठ्या कॉलन्यांमधील शेकडो नागरिक येथून ये-जा करत असतात. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तात्काळ रस्ता करण्यासाठी नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी ‘दु:खद निधन, रस्ता मृत्यू पावला आहे,’ असा फलक लावला. फलकास हार आणि गुलाल लावून रस्त्यास श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, वल्लभ देसाई, अक्षय चाबूक, समीर जगदाळे, अमित पाटील, वैशाली सूर्यवंशी, रत्नम दृपडकार, गौरव ढेंगे आदी उपस्थित होते.

फोटो : १३०२२०२१ कोल केएमसी रिंगरोड रस्ता

फोटो : १३०२२०२१ कोल केएमसी रिंगरोड रस्ता२

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने फुलेवाडी रिंग रोड येथील खराब झालेला रस्ता आंदोलन करूनही केला नसल्यामुळे शुक्रवारी येथे ‘दु:खद निधन, रस्ता मृत्यू पावला आहे’ असा फलक लावून अनोखे आंदोलन केले.

Web Title: 'Tribute' to bad roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.