ज्येष्ठ संपादक सदा डुंबरे यांना श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:49+5:302021-03-01T04:28:49+5:30
अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये पालक सभा कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये मंगळवारी दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा झाली. ...
अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये पालक सभा
कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये मंगळवारी दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा झाली. त्यानंतर पालक सभा घेण्यात आली. यावेळी डॉ. शुभदा दिवाण यांनी ‘करिअर’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी पालकांना स्वलिखित पुस्तकांचे मोफत वाटप केले. यावेळी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणी आजरेकर, उपाध्यक्ष आदिल फरास, प्रशासक कादर मलबारी, शालेय समितीचे अध्यक्ष अलताफ झांजी, रफिक शेख, बाबासाहेब शेख उपस्थित होते. परविन नसरदी यांनी स्वागत केले.
गजानन राशीनकर यांचा सत्कार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांनी स्तनांच्या कर्करोगावर मात करणाऱ्या फेरोसीफेन औषधाची निर्मिती करून त्याचे पेटंट मिळविले आहे. त्याबद्दल श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. राशीनकर यांनी संशोधन केलेल्या औषधामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीचे नवे पर्व सुरू झाल्याचे चौगुले यांनी सांगितले. प्रा. राशिनकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. दत्ता पाटील, डॉ. प्रकाश बनसुडे, प्रमोद समुद्रे उपस्थित होते.
फोटो (२८०२२०२१-कोल-गजानन राशीनकर (सत्कार) : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचा श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी सत्कार केला. यावेळी शेजारी दत्ता पाटील, प्रकाश बनसुडे, प्रमोद समुद्रे उपस्थित होते.