सूर्याला वंदन करीत आरोग्याचे धड--सामूहिक सूर्यनमस्कार : ‘लोकमत’चा उपक्रम; भल्या पहाटे आबालवृद्धांसह नागरिकांची गर्दी

By admin | Published: January 28, 2015 12:40 AM2015-01-28T00:40:15+5:302015-01-28T01:01:20+5:30

सामूहिक सूर्यनमस्कार : ‘लोकमत’चा उपक्रम; भल्या पहाटे आबालवृद्धांसह नागरिकांची गर्दीे

Tribute to the sun - collective sun worship: 'Lokmat' initiative; Citizens crowd with goodwill in the morning | सूर्याला वंदन करीत आरोग्याचे धड--सामूहिक सूर्यनमस्कार : ‘लोकमत’चा उपक्रम; भल्या पहाटे आबालवृद्धांसह नागरिकांची गर्दी

सूर्याला वंदन करीत आरोग्याचे धड--सामूहिक सूर्यनमस्कार : ‘लोकमत’चा उपक्रम; भल्या पहाटे आबालवृद्धांसह नागरिकांची गर्दी

Next

कोल्हापूर : जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह व पतंजली योग समिती यांच्यावतीने आज, मंगळवारी झालेल्या सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या उपक्रमाचे युनिक आॅटोमोबाईल हे मुख्य प्रायोजक होते.
धुके, बोचरी थंडी असूनसुद्धा अनेकांची पावले सहा वाजल्यापासूनच शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानाकडे वळत होती. यामध्ये लहान मुलांसह तरुण, तरुणी व वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. सातच्या सुमारास चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. नारायण, पतंजली योग समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर खापणे, सिनेटचे सदस्य अनिल घाटगे व ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने उपक्रमाची सुरुवात झाली.
प्रारंभी गिरीश आरेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. पतंजली योगपीठाचे अध्यक्ष चंद्रशेखर खापणे यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. त्यानंतर योगशिक्षक डॉ. शरद हुन्सवाडकर यांनी सूर्यनमस्कारांची शास्त्रशुद्ध माहिती सांगून उपस्थितांकडून सूर्यनमस्कार करवून घेतले. नमस्कारासन, हस्तउत्तानासन, हस्तपादासन, पादसंचलनासन, पर्वतासन, अष्टांगासन, भूजंगासन, अशी आसने दाखवून त्यांची सविस्तर माहिती दिली. सुमारे तासभर हा उपक्रम झाला. याप्रसंगी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला. शांतिपाठ व राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता झाली.
उपक्रमात सहभागींना युनिक आॅटोमोबाईलचे ग्रुप हेड सुधर्म वाझे व ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. या उपक्रमासाठी ओरिएंटल इंग्लिश स्कूलचे शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत स्कूलचे क्रीडाशिक्षक शरद पोवार, शैलेंद्र बनसोडे हे उपस्थित होते.

मंगळवारी ‘लोकमत’ आयोजित सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करताना युनिक आॅटोमोबाईलचे ग्रुप हेड सुधर्म वाझे. शेजारी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले.

कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर मंगळवारी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभागी झालेले नागरिक. दुसऱ्या छायाचित्रात सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रमात दीपप्रज्वलन करताना डॉ. शरद हुन्सवाडकर. याप्रसंगी डावीकडून दिव्यानी पालनकर, सूर्यकांत गायकवाड, चंद्रशेखर खापणे, रघुनाथ घाटगे, अनिल घाटगे, मकरंद देशमुख, भारत खराटे.

Web Title: Tribute to the sun - collective sun worship: 'Lokmat' initiative; Citizens crowd with goodwill in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.