शिंदेंच्या स्मारकासाठी प्रयत्न : गवळी
By admin | Published: January 29, 2015 09:51 PM2015-01-29T21:51:50+5:302015-01-29T23:42:01+5:30
हीद शिंदे यांच्या मुंबई येथील २६/११च्या बलिदानाबद्दल गौरवोद्गार काढले. शहीद शिंदे यांच्या मूळ गावी रिक्टोली येथे स्मारक उभारणीसाठी आपण आग्रही असून,
चिपळूण : रिक्टोली येथील शहीद शशांक शिंदे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक माधव गवळी यांनी दसपटीमध्ये शशांक शिंदे यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील व आग्रही राहणार असल्याचे क्रीडा रसिकांसमोर स्पष्ट केले. श्री चंडिका देवी क्लब, रिक्टोली आयोजित शहीद शशांक शिंदे स्मृती चषक उद्घाटन कार्यक्रमात बोलताना गवळी यांनी शहीद शिंदे यांच्या मुंबई येथील २६/११च्या बलिदानाबद्दल गौरवोद्गार काढले. शहीद शिंदे यांच्या मूळ गावी रिक्टोली येथे स्मारक उभारणीसाठी आपण आग्रही असून, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन केले. दि. २५ व २६ रोजी शहीद शिंदे स्मृती चषक क्रीडा स्पर्धा दसपटीत भरवली जात असून, तरुणांमध्ये क्रीडा व राष्ट्रप्रेम वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल रिक्टोलीतील ग्रामस्थांनी उचलल्याने गवळी यांनी भाषणात त्यांचेही अभिनंदन केले. रिक्टोलीतील काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी भाजपा युवा नेता म्हणून तत्पर असेन, असेही गवळी म्हणाले. पाणी, रस्ते, वीज यांच्या समस्या असतील, तर त्यांचेही लवकर निवारण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला राहुल शिंदे, प्रसाद शिंदे, प्रशांत जाधव, सुधीर जाधव, आशिष शिंदे, विवेक शिंदे, महेश सावंत, अवधूत सावंत, नारायण चव्हाण व मुंबईतील निवासी ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी व दसपटीतील संघ उपस्थित होते. रिक्टोलीतील हनुमान मंदिराजवळील पटांगणात या स्पर्धा खेळविण्यात आल्या. कार्यक्रमामध्ये रिक्टोली ग्रामस्थांतर्फे गवळी यांचा सत्कार करण्यात आला. रिक्टोली मुंबई कमिटी पदाधिकारी व सदस्यांनी गवळी यांचे आभार व्यक्त करुन विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री चंडिका देवी क्लब रिक्टोली यांनी मेहनत घेतली. (प्रतिनिधी)