Accident News kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गावर किणीनजीक तिहेरी अपघात, तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:02 PM2022-07-02T14:02:55+5:302022-07-02T14:43:32+5:30

या तिहेरी अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला

Triple accident near Kini on Pune Bangalore highway, three killed | Accident News kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गावर किणीनजीक तिहेरी अपघात, तिघे ठार

Accident News kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गावर किणीनजीक तिहेरी अपघात, तिघे ठार

Next

किणी (कोल्हापूर): पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी तालुका हातकंणगले गावाजवळील उड्डाणपुलावर थांबलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. दरम्यान, कारला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिल्याने तिहेरी अपघातात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला.

त्रिलेश कुमार सी (वय ४२),  जिथ्या त्रिलेश (११) व संजना माहेश्वरी (२७, सर्व रा. बसवेश्वरनगर, बेंगलोर, कर्नाटक) अशी मृत तिघांची नावे आहेत. तर अरिन एन (४१) या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी (दि.२) मध्यरात्रीच्या सुमारास झाला. अपघातात कारचा चकाचुर झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किणी गावाजवळील महामार्गाच्या उड्डाणपूलावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजुच्या उताराला नादुरुस्त झाल्याने ट्रक (एम.एच-११-सी.एच-२७७९) थांबला होता. दरम्यान बेंगलोरहून शिर्डीला जाणाऱ्या कारची (केए-०२-एम.एस-६६१२) पाठीमागुन जोराची धडक झाली. दरम्यान मुंबईकडे निघालेल्या ट्रकने (के.ए-२७ बी-४५४४) कारला पाठीमागुन जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली.

जखमी अरिन एन यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा चकाचुर झाला होता तर दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त तिन्ही वाहने क्रेनने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Triple accident near Kini on Pune Bangalore highway, three killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.