सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील  पर्यटन शुल्कात तिपटीने वाढ; पर्यटकांमध्ये नाराजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 08:08 PM2022-06-05T20:08:34+5:302022-06-05T20:08:52+5:30

सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली

Tripling of tourism charges at Sahyadri Tiger Reserve; Dissatisfaction among tourists | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील  पर्यटन शुल्कात तिपटीने वाढ; पर्यटकांमध्ये नाराजी 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील  पर्यटन शुल्कात तिपटीने वाढ; पर्यटकांमध्ये नाराजी 

googlenewsNext

अनिल पाटील 

सरूड -  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यास जाणाऱ्या पर्यटकांना आता वाढीव पर्यटन शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे . या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटक शुल्कात तब्बल तिपटीने वाढ करण्यात आली आहे . यापुर्वी प्रति पर्यटक तीस रु आकारला जाणार पर्यटक कर आता प्रति पर्यटक शंभर रु प्रमाणे आकारण्यात येणार आहे . तर १२ वर्षाखालील लहान पर्यटक , गाईड , वाहन कर , कॅमेरा शुल्क या मध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे . या शुल्क वाढीने पर्यटकांच्यातुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . वनसंरक्षक तथा क्षेत्रपाल संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडुन बैठकीचे इतिवृत्त पाठविण्यात आले आहे . यामध्ये पर्यटन शुल्काच्या वाढीव दरास नियामक मंडळाकडुन मंजूरी देण्यात आली आहे . त्यानुसार हे दर वाढविण्यात आल्याची माहिती चांदोली चे वनक्षेत्रपाल ( वन्यजीव ) नंदकुमार नलवडे यांनी दिली . 

या व्याघ्र प्रकल्पात कोल्हापूर , सांगली , सातारा जिल्ह्या सह इतर जिल्ह्यांतील पर्यटकंही पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येत असतात . विशेषता सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते . लहान मुलापासुन अबाल वृद्धा पर्यंतचे पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद लुटतात . यापुढे या सर्व पर्यटकांन वाढीव शुल्काचा भुर्दंड सहन करावा  लागणार आहे .
 
पर्यटन वाढीव शुल्क खालील प्रमाणे
 तपशील   =               पूर्वीचे दर   =    आताचे दर 

१ ) १२ वर्षावरील पर्यटक = ३० रु       = १०० रु

२)  १२ वषीखाली पर्यटक = १५ रु       = ५० रु 

३)   गाईड फी                = २०० रु       = २५० रु

४)  वाहन शुल्क             = १५० रु        = २०० रु

५)  कॅमेरा शुल्क             = ५० रु         = १०० रु 
 

Web Title: Tripling of tourism charges at Sahyadri Tiger Reserve; Dissatisfaction among tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.