तृतीयपंथी पांडुरंगाने आदमापूर शाळेला दिली लाखाची देणगी, सत्काराने पांडुरंगही भारावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:56 AM2024-07-18T11:56:08+5:302024-07-18T11:56:36+5:30
सरवडे : आपण तृतीयपंथी आहोत याची खंत कधी मनात बाळगली नाही. समाजानेही अनेक वेळा अवहेलना केली वाईट बोलणं तर ...
सरवडे : आपण तृतीयपंथी आहोत याची खंत कधी मनात बाळगली नाही. समाजानेही अनेक वेळा अवहेलना केली वाईट बोलणं तर अनेकदा सहन केली. नशीबी आलेले जिणं एक संधी समजून मी जगू लागलो. यातूनच शुभशकुन देण्याच्या अनुषंगाने आदमापूर गावामध्ये गेले चार वर्ष मी फिरतो. त्यातूनच काही रक्कम जमा झाली. माझाही उदरनिर्वाह करत काही रक्कम आपण सामाजिक कार्यासाठी दिली पाहिजे तेही समाजाचे ऋण आहे हे फेडले पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून ज्या ठिकाणीही पैसे मिळवले त्या आदमापूर गावातील शाळेच्या कामासाठी देणगी दिली. असे मत पांडुरंग गुरव यांनी बोलून दाखवले.
विद्यामंदिर आदमापुर शाळेचे गेले तीन वर्षे बांधकाम सुरु आहे. देवदत्त गंगावली यांनी ३० लाखाची देगणी दिली आहे. ग्रामस्थाकडून देणगी गोळा करण्याचे काम सुरु आहे. या नवीन इमारतीचा बांधकाम खर्च अंदाजे एक कोटी इतका आहे.त्या कामासाठी गुरव यांनी देणगी दिली. त्यावेळी गुरव यांचा शाळा व्यवस्थापन व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी सत्कार केला त्यावेळी तो भावुक झाला.
चंदगड तालुक्यातील आसगोली हे पांडुरंग गुरव यांचे मूळ गाव आहे. आपण तृतीयपंथी असल्याची खंत मनात न ठेवता जगण्याची एक नवी संधी आहे. यातूनच स्वतःसाठी आणि समाजासाठी जगाचे हे मनी ठेवून समाजात वावरतो आहे. अनेकदा अवेहला होते. बोलणे ,टोमणे सोसले आणि अजूनही सोसत आहेच. शुभ शकुन म्हणून डोके वर हात ठेवला की लोक दहा रुपये देतात ते आनंदाने स्वीकारत आजही आम्ही फिरतो.
आदमापुरात संत बाळूमामाच्या पवित्र नगरीत राज्यभरातून आलेल्या भक्तांच्या मार्फत मिळालेल्या पैशातून या आदमापुर गावाला सामाजिक कार्यासाठी काही अल्प अशी मदत केली आहे असल्याचे तो सांगतो. देणगी स्वीकारताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील, मुख्याध्यापक डी.डी.पाटील, एस.डी.खतकर, एस.के.पाटील, तानाजी पाटील उपस्थित होते. देणगीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे