ट्रकला कारची धडक; दोन व्यापारी ठार, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:50+5:302021-03-10T04:23:50+5:30
पाचवड (जि. सातारा) : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्यातील जोशी विहीर येथील उड्डाणपुलावर ट्रकला कारने पाठीमागून धडक ...
पाचवड (जि. सातारा) : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाई तालुक्यातील जोशी विहीर येथील उड्डाणपुलावर ट्रकला कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघे जण ठार झाले असून चारजण जखमी झाले. सुभाष बाबूराव पाटील (वय ७१, रा. बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली) व प्रवीण नामदेव टेगिमाळी (१८, रा. दत्त कॉलनी, जत, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. मृत व जखमी सर्व व्यापारी असून ते नाशिक येथे निघाले होते. हा अपघात मंगळवार, दि. ९ रोजी पहाटे तीन ते चारच्या सुमारास झाला.
सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने (एमएच १० सीएक्स ९८०७) जोशी विहीर उड्डाणपुलावर समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये कारमधील सहाजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी पैकी सुभाष पाटील व प्रवीण टेगिमाळी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. तर महेश महादेव नवाळे (४२), शुभांगी महेश नवाळे (३२), शबाना मोहम्मद पठाण (३८, तिघे रा. विटा, जि. सांगली), प्रणव दीपक लोंढे (२१, रा. वाळुंज, ता. खानापूर, जि. सांगली) हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण व्यापारी असून ते कावीळवरील औषधोपचारासाठी नाशिक येथे निघाले होते.