रक्तदान करून जपला बकरी ईदचा खरा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:58+5:302021-07-22T04:15:58+5:30

कोल्हापूर: कुर्बानीच द्यायची तर कुणाचाही तरी जीव वाचावा अशी द्यावी, हा संदेश देत बुधवारी कोल्हापूर शहरात दहा जणांनी रक्तदान ...

The true message of Japla Eid by donating blood | रक्तदान करून जपला बकरी ईदचा खरा संदेश

रक्तदान करून जपला बकरी ईदचा खरा संदेश

Next

कोल्हापूर: कुर्बानीच द्यायची तर कुणाचाही तरी जीव वाचावा अशी द्यावी, हा संदेश देत बुधवारी कोल्हापूर शहरात दहा जणांनी रक्तदान करून बकरी ईदचा उद्देश खऱ्या अर्थाने आचरणात आणला. जमा झालेल्या रक्ताच्या बॅग सीपीआर रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आल्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग हे एक महत्त्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात तर इच्छा, ध्येय साध्य करण्यासाठी कुर्बानी अर्थात सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्यागाचे प्रतीक म्हणूनच बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा पाळली जाते, पण आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता इस्लामसह सर्वच धर्मीयांनी आपले सण अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे गरजेचे आहे. हा विचार समोर ठेवून सत्यशोधक मंडळ व अंनिसकडून बकरी ईद दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अंनिसचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अरुण शिंदे, दिलदार मुजावर, गौतम कांबळे, महेश कांबळे, रोहन चोडणकर, भारतजीवन प्रभूखोत, राजवैभव शोमा रामचंद्र, यशवंती शिंदे, रवींद्र वाळवेकर, निशांत सुनंदा विश्वास यांनी परिश्रम घेत स्वत: रक्तदानही केले.

फोटो: २१०७२०२१-कोल- रक्तदान अंनिस

फोटो ओळ: अंनिस व मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने रक्तदान करून अनोख्या पद्धतीने बकरी ईदचा त्यागाचा संदेश प्रत्यक्षात आणला गेला.

Web Title: The true message of Japla Eid by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.