हेच खरं 'स्वच्छता अभियान', कोल्हापूरचा कचरा साफ करतायंत महापालिका आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:04 AM2019-08-14T10:04:13+5:302019-08-14T10:08:11+5:30

शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात

This is the true sanitation campaign, while removing the garbage from Kolhapur, the Municipal Commissioner mallinath kalshetty | हेच खरं 'स्वच्छता अभियान', कोल्हापूरचा कचरा साफ करतायंत महापालिका आयुक्त 

हेच खरं 'स्वच्छता अभियान', कोल्हापूरचा कचरा साफ करतायंत महापालिका आयुक्त 

Next
ठळक मुद्देशहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे आपण काम केल्यांच पाहिल्यास इतर कर्मचारीही जोमाने काम करतील

कोल्हापूर - स्वच्छ भारत मिशन अभियानावेळी हजारो सेलिब्रिटी हात पुढे आले होते. शेकडो नेते आणि लाखो कार्यकर्ते स्वच्छता मोहीम राबवत होते. भारत स्वच्छ करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच भारत स्वच्छ केला होता. मात्र, खऱ्या स्वच्छता अभियानाची गरज आता आहे. सांगली आणि कोल्हापूरातील पूरस्थिती ओसरल्यानंतर तेथील नागरिकांच्या आरोग्यासाठी, शहराच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवींचे हात पुढे येत आहेत.  

शहरातील महापुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाणी तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये म्हणून स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून फक्त पूरग्रस्त भागात 400 कर्मचारी अत्यावश्यक मशिनरीच्या सहाय्याने काम करीत आहेत. संपूर्ण शहरात सुमारे दीड हजार कर्मचारी स्वच्छतेच्या कामात योगदान देत असून एरव्ही एका शिफ्टमध्ये चालणारे काम आता दोन शिफ्टमध्ये सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे अखंड बारा तास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यात स्वत: महापालिका आयुक्तही हातात ग्लोज घालून रस्त्यावर उतरले आहेत. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, ते स्वत: घाण काढून शहराला स्वच्छ करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे केवळ दिखाऊपणा किंवा चकमोगिरीसाठी नव्हे, तर गेली अकरा रविवार म्हणजे तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांसमेवत ते रस्त्यावरील कचरा झाडत आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानावेळी हाती घेतलाला झाडू कलशेट्टी यांनी अद्यापही कायम सोबत ठेवला आहे. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे आपण काम केल्यांच पाहिल्यास इतर कर्मचारीही जोमाने काम करतील, केवळ भाषणाबाजीन करता कृतीतून आपला विचार लोकांपर्यंत मांडायचा असतो, असे कलशेट्टी यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, शहरातील महापुराची परिस्थिती आता सुधारत असून अनेक ठिकाणांचे पुराचे पाणी ओसरले आहे. आता पूरग्रस्त भागात केवळ दूषित पाण्याची डबकी, कुजलेला गाळ यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने आधी पुराच्या पाण्याचा सामना केला. आता शहर स्वच्छतेच्या आव्हानाचा सामना करत आहे.
महापालिकेचे शहरात एकूण 12 आरोग्य विभाग असून त्यांच्या अखत्यारीत सुमारे दीड हजार कर्मचारी काम करत असतात. त्यातील 400 कर्मचारी केवळ पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे जेसीबी, आवश्यक डंपर, काळ उचलणारे ट्रॅक्टर, जेट मशीन, औषध फवारणी पंप अशी यंत्रसामग्री देण्यात आली आहे.
 

Web Title: This is the true sanitation campaign, while removing the garbage from Kolhapur, the Municipal Commissioner mallinath kalshetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.