खरा ‘टीआरपी’ पुन्हा गुलदस्त्यातच- : आॅनलाईन, अॅपवरील पे्रक्षक नोेंदीच्या कक्षेबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:53 AM2019-11-29T11:53:03+5:302019-11-29T11:54:45+5:30
पॅकेजसह हे चॅनेल घेतल्यास ते स्वस्तात देण्यात आले. यामुळे बहुतांश ग्राहकांनी पॅकेजसह चॅनेल घेतली आहेत. यामध्ये ग्राहक सर्वाधिक चॅनल अथवा कोणती मालिका पाहतात, याची माहिती तंतोतंत उपलब्ध होत नाही. याचा परिणाम खरा ‘टीआरपी’ समजण्यावर झाला आहे
विनोद सावंत
कोल्हापूर : ‘ट्राय’ने (टेलिव्हिजन रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया) केबल ग्राहकांना पसंतीनुसार चॅनेल घेण्याची सुविधा केल्यामुळे चॅनेलचा खरा टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) समजेल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु चॅनेल कंपनीने कमी पसंतीच्या चॅनेलचे पितळ उघड होऊ नये यासाठी ग्राहकांना जादा पसंती असणारे चॅनेल स्वतंत्र घ्यावयाचे झाल्यास जादा दर लावले आहेत. याउलट पॅकेज घेतल्यास १५ ते २० चॅनेल स्वस्त देण्यात आली आहेत. यामुळे ग्राहकांनाही नाइलाजास्तव पॅकेज घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये ग्राहक नेमके कोणते चॅनेल किती वेळ पाहतात, हे तपासणी करण्याची यंत्रणा सध्या तरी उपलब्ध नसल्यामुळे खरा टीआरपी पुन्हा गुलदस्त्यातच राहिला आहे.
टीआरपीवर चॅनेलचे महत्त्व, जाहिराती देण्याचा निर्णय होतो. ज्याचा जास्त टीआरपी, त्याला जाहिराती जास्त असा अलिखित नियमच बनला आहे. त्यामुळे चॅनेल कंपनीसाठी ‘टीआरपी’ हा विषय फार महत्त्वाचा आहे. टीआरपी ठरविण्यासाठी ठरावीक लोकांच्या घरांमध्ये टीव्हीसोबत टीआरपी मोजण्याचे मशीन ठेवले जाते. लोक कोणते चॅनेल, कोणती मालिका सर्वाधिक पाहतात याची नोंद होते; परंतु ठरावीक घरांमध्ये मशीन बसविल्याने यामधून खरा टीआरपी समोर येईल, याची खात्री नाही. ‘ट्राय’ने पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा दिली; परंतु चॅनेल कंपनीने जास्त पाहिले जाणाऱ्या चॅनेलचे दर जादा केले. पॅकेजसह हे चॅनेल घेतल्यास ते स्वस्तात देण्यात आले. यामुळे बहुतांश ग्राहकांनी पॅकेजसह चॅनेल घेतली आहेत. यामध्ये ग्राहक सर्वाधिक चॅनल अथवा कोणती मालिका पाहतात, याची माहिती तंतोतंत उपलब्ध होत नाही. याचा परिणाम खरा ‘टीआरपी’ समजण्यावर झाला आहे
हे केल्यास मिळेल ग्राहकांना न्याय
सेटटॉप बॉक्सच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वच चॅनेल उपलब्ध करून देण्यात आली पाहिजेत. यापैकी ग्राहक दिवसभरात कोणते चॅनेल किती वेळ पाहतो, त्यानुसार त्या चॅनेलच्या दरानुसार बिल आकारणी केल्यास खºया अर्थाने पसंतीनुसार चॅनेलची संकल्पना पूर्ण होईल. याचबरोबर चॅनेलचा खरा ‘टीआरपी’ही समोर येईल. मात्र, असे तंत्रज्ञान सध्या तरी उपलब्ध नसल्याची माहिती केबल सिस्टीम चालकांकडून येत आहे.
सध्या बहुतांश नागरिकांचा कल डीटीएच, आॅनलाईन, मोबाईल कंपनीच्या माध्यमातून असणाºया लाईव्ह टीव्ही पाहण्याकडे वाढला आहे. याचबरोबर काही मोबाईल अॅपही चॅनलवरील मालिकांचे प्रक्षेपण करतात. या अॅपच्या माध्यमातून टीव्हीवर झालेली मालिका अथवा खेळाचे सामने नंतर आपल्या सवडीने पाहता येतात. यावरील पे्रक्षकांची नोंद कुठेच होत नाही. हे ‘टीआरपी’च्या कक्षेत येत नाहीत, हेही वास्तव आहे.