राज्यातील सात जिल्हा बँकांचे बिगुल वाजले; नव्या वर्षात अखेर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:14 AM2020-12-31T00:14:52+5:302020-12-31T00:15:07+5:30

राजाराम लोंढेे काेल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ४ जानेवारीला राज्य ...

The trumpets of seven district banks in the state sounded | राज्यातील सात जिल्हा बँकांचे बिगुल वाजले; नव्या वर्षात अखेर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

राज्यातील सात जिल्हा बँकांचे बिगुल वाजले; नव्या वर्षात अखेर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार

Next

राजाराम लोंढेे

काेल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ४ जानेवारीला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सुरू होणार आहे. यामध्ये बीड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अहमदनगर, गडचिरोली व अकोला या सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे. 

राज्य शासनाने २७ जानेवारी २०२० रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. मार्च २०२०पर्यंत मुदत दिली असली तरी, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने तीन-तीन महिने निवडणुकांना मुदतवाढ दिली आहे. मात्र ही मुदतवाढ देताना उच्च व सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश केले आहेत, त्यांना वगळण्यात आले होते. जरी न्यायालयाचे आदेश असले तरी कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत हाेता. त्यामुळे अशा वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते. आता संसर्ग कमी झाल्याने निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली शासन पातळीवर आहे.

या संस्थांच्या निवडणुका होणार

जिल्हा बँक : बीड, अहमदनगर, परभणी, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला, नांदेड.
साखर कारखाने : मुळा- नेवासा, लोकनेते घुले पाटील-नेवासा, वृद्धेश्वर- पाथर्डी.
विकास संस्था : बाबुर्डी- अहमदनगर, मांध्ये- अहमदनगर, बाबुर्डी बेंड- अहमदनगर, वाळूंज- अहमदनगर, खिर्डी- श्रीरामपूर, राजे शिवछत्रपती- श्रीगोंदा, दशमी गव्हाण- अहमदनगर, घोटवी- श्रीगोंदा, सिद्धेश्वरवाडी- पारनेर, सारोळा- अहमदनगर, निंब नांदूर- शेवगाव, सुरेगाव- श्रीगोंदा, मुंगूसगाव- श्रीगोंदा, मल्हार निंबोडी- अहमदनगर, माता साळवणदेवी- श्रीगोंदा, माळ वडगाव- श्रीरामपूर, जनाई- श्रीगोंदा, कारेगाव- श्रीरामपूर, सेवा -वाशीम, दिवशी बुद्रुक- नांदेड, दिवशी खुर्द- नांदेड, भोसी- नांदेड, बटाळा-नांदेड, लाेहगाव- नांदेड, दुगाव- नांदेड.
बँक : धुळे-नंदुरबार जिल्हा पगारदार बँक. 
पतसंस्था : सर्वोदय शिक्षण प्रसारक, जळगाव व सवादा, जळगाव.

 

Web Title: The trumpets of seven district banks in the state sounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.