रोहित, श्रद्धा यांचा सत्यशोधक विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:05+5:302021-07-15T04:18:05+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्री शाहू सत्यशोधक समाज आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राच्यावतीने रोहित आणि श्रद्धा यांचा ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्री शाहू सत्यशोधक समाज आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राच्यावतीने रोहित आणि श्रद्धा यांचा श्री शाहू सत्यशोधक समाज गंगावेश येथे जात निरपेक्ष सत्यशोधक विवाह लावण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी सत्यशोधकी विवाहाची भूमिका सांगितली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नूतन जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अरुण शिंदे आणि श्री सत्यशोधक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष बाबूराव कदम, स्वाती कृष्णात, निशांत शिंदे, संजय नाझरे, स्वप्नील वर्धन, अर्चना पांढरे, विवेक पोतदार यांनी वधूवरांना सहजीवनाचे संकल्प दिले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी वधूवरांना विवेकी सहजीवनाची शपथ दिली. विवाहाचे संचालन कृष्णात स्वाती यांनी केले. यावेळी तानाजी वर्धन, मीना वर्धन, अरुण वर्धन, रवी जिरगे उपस्थित होते.
फोटो (१४०७२०२१-कोल-सत्यशोधक विवाह) : कोल्हापुरात सोमवारी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील रोहित वर्धन आणि इचलकरंजीतील श्रध्दा यांनी सत्यशोधक विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. यावेळी शेजारी बाबूराव कदम, टी. एस. पाटील, अरूण शिंदे आदी उपस्थित होते.
140721\14kol_1_14072021_5.jpg
फोटो (१४०७२०२१-कोल-सत्यशोधक विवाह) : कोल्हापुरात सोमवारी सिध्दनेर्ली (ता. कागल) येथील रोहित वर्धन आणि इचलकरंजीतील श्रध्दा यांनी सत्यशोधक विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. यावेळी शेजारी बाबुराव कदम, टी. एस. पाटील, अरूण शिंदे, आदी उपस्थित होते.